गोंदिया - ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंदिया येथील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कवायत करण्यात आली. मुख्य ध्वजारोहण राज्याचे गृहमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संयुक्त संचलन केले गेले, यानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले व पोलिसांची मानवंदना स्वीकारली.
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस भरती थांबलेली होती. मात्र, आता राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून त्यामुळे राज्यातील तरुणांना पोलीस सेवेत काम करण्याची संधी मिळेल, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - देवरीतील मॅरेथॉनमध्ये धावले हजारो धावपटू; १६ जिल्ह्यातील धावपटूंनी घेतला सहभाग
राज्यातील महिलांची सुरक्षा, अवैध सावकारीवर कारवाई तसेच शेतकरी कर्जमाफीची सूट ही दोन लाखाच्यावर करण्याचा मानस राज्य सरकारचा असून महाविकास आघाडी लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी पोलीस पथक, सी-६० पथक, होमगार्ड पथक व शालेय विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते कुलदीप लांजेवार यांना यावर्षीचा युवा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा - गोंदियात पहिल्यांदाच पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन