गोंदिया - जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या नराधमाने नातीसह दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर बाललैगिंक अत्याचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
गोंदियातील एका खेडेगावात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने नात आणि आजोबाच्या नात्याला काळीमा फासला. घरी कुणीही नसल्याचे पाहून आरोपीने पीडित मुलींना शेतावर जाऊन लोखोंरीच्या शेंगा खायला जाऊ, असे सांगितले. तसेच, आरोपीने दोन्ही मुलींना खाऊ खाण्यासाठी १० रूपयांचे आमिषही दिले. त्यानंतर मुलींना शेतावर नेऊन अत्याचार केला. पीडित मुलींपैकी एक आरोपीची नात आहे तर दुसरी मुलगी शेजारी राहते.
हेही वाचा - नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू
मुलींनीही भीतीपोटी झालेला प्रकार घरी सांगितला नाही. मात्र, पीडित मुलींपैकी एकीला वेदना झाल्याने तिने याची माहिती आईला दिली. पीडितेच्या आईने आरोपीविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ नराधम आजोबाला अटक केली आहे.