गोंदिया - राज्यात गुटखा, पान मसाला तसेच तंबाखू पदार्थांवर बंदी असताना तंबाखुची मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीनी विक्री केली जाते. जिल्ह्यातील देवरी तालुका हा मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने अनेकदा या मार्गाने तस्करी केली जाते. अशाच एका गुप्त माहितीच्या आधारे देवरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
देवरी परिसरात गुटखा आणि तंबाखूची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याची माहिती देवरी पोलिसांना मिळाला. ही माहिती मिळताच पोलिसांनी तहसीलदारांच्या मदतीने देवरी शहरातील किराणा दुकानाची तपासणी केली. यामध्ये विशाल किराणा दुकान आणि सुरेश किराणा दुकान, या दोन ठिकाणी सुगंधित तंबाखू आढळून आली आहे. दोन्ही दुकानात सुगंधित तंबाखू छुप्या पद्धतीने विकली जात असून तब्बल ४ पोती सुंगंधीत तंबाखू पोलीस आणि महसूल विभागाच्या धाडीत हस्तगत करण्यात आली आहेत. प्रकरणी महाराष्ट्र अमली पदार्थ कायद्या अंर्तगत देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - राज्यभरात मुसळधार; अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा