गोंदिया - झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यातील ग्राम देवीपूर येथे अतिप्रसंग प्रकरणातील 3 आरोपी हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने पळून जात होते. त्यांना गोंदिया रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त अभियान राबवून अटक केली व पुढील कारवाईसाठी झारखंड पोलिसांच्या सुपूर्द केले. ही कारवाई मंगळवार 8 जून रोजी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल असलेले 3 आरोपी ट्रेन क्रमांक 02834 हवडा-अहमदाबाद एक्सप्रेसने टाटानगर ते सूरतकडे जात आहेत, अशी सूचना झारखंड राज्याच्या ग्राम देवीपूर जिल्हा देवघर पोलिसांनी गोंदिया रेल्वे पोलिसांना फोनद्वारे दिली. या आरोपींवर भादंविच्या कलम 363, 376, 120 (ब), 34 व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 4 अन्वये गुन्हा दाखल आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये राजेश भीम मंडल (वय 21), राधेश्याम उर्फ लेखो लक्ष्मण मंडल (वय 24) व विजय बिरजू मंडल (वय 20) सर्व रा. ग्राम सिरी पोलीस ठाणे देवीपूर यांचा समावेश आहे.
अशी केली आरोपींना अटक -
झारखंड पोलिसांकडून सूचना मिळताच गोंदियाचे रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांनी संयुक्तरित्या अभियान राबविले. गाडी प्लॉटफार्म क्रमांक 3 वर पोहचताच तिन्ही आरोपींचा तपास करण्यास सुरुवात करण्यात आली. तिन्ही आरोपींची ओळख व खात्री होताच त्यांना गोंदिया रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. त्यानंतर देवीपूर झारखंड पोलिसांकडून याबाबत पुष्टी केल्यानंतर गोंदिया रेल्वे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याची माहिती झारखंड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर 8 जून रोजी झारखंड पोलिसांचे उपनिरीक्षक प्रेम प्रदीपकुमार यादव आपल्या स्टाफसह गोंदियाला पोहचले व तिन्ही आरोपींना आपल्या ताब्यात घेतले.
ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक एस राजकुमार, रेलवे सुरक्षा दलाचे मंडल सुरक्षा आयुक्त पंकज चुघ, रेलवे पोलिसांचे अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, सहायक मंडल सुरक्षा आयुक्त एस.डी. देशपांडे, रेलवे पोलिसांचे उपविभागीय पोलीस अधिकारी देशपांडे तथा एस.व्ही. शिंदे के मार्गदर्शनात गोंदिया रेलवे सुरक्षा दलाचे प्रभारी नंदबहादुर यादव, रेलवे पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाने, सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, रेलवे पोलिसांचे उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, आरक्षक रायकवार, पी दलाई, नासिर खान, लिल्हारे, दिव्या सिंह, ओमप्रकाश सेलौटे, नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय, चंदू भोयर यांनी केली.