गोंदिया - दंतरोग तज्ञ असलेल्या महिला डॉक्टरने स्वतः राहत असलेल्या किरायाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ( Doctor Commits Suicide Gondia ) घडली आहे. ही घटना आज ४ मार्च रोजी उघडकीस आली. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथिल वीर सावरकर वार्ड येथे किरायाच्या घरी राहत होती. डॉ. नेहा पारधी वय 26 वर्ष असे मृतक डॉक्टर महिलेचे नाव आहे.
किरायाच्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या -
नेहा मुळची तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील रहिवासी आहे. नेहाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट आहे. क्लिनिकमध्ये पेंशन्ट येऊन गर्दी करत असताना डॉक्टर नेहा क्लिनिकमध्ये का आल्या नाही हे बघायचा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या कर्मचारी त्यांच्या घरी पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या गेल्याचे दिसून आले आहे. याची माहिती त्याने तत्काळ घरमालकाला दिली आणि घरमालकाने तिरोडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास तिरोडा पोलीस करत आहेत.