नागपूर - गडचिरोलीतील कोरोनाबाधितांचा आकडा शुन्यावर आनण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया गडचिरोलीचे पालकमंत्री एकथान शिंदे यांनी दिली. त्याच बरोबर विविध ठिकाणी कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक असल्याचे देखील ते म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्याचं आगमन झाले. गडचिरोली जिल्हा हे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे यावेळी मांत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील सद्यस्थितीवर विविध प्रशासकीय बैठका सुद्धा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या दौऱ्यात कोरोना बाबत कोण कोणते नियोजन करता येईल याबद्दल चर्चा व सूचना देणार असल्याचे एकथान शिंदे यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्हात कोरोनाचा प्रभाव फार कमी होता. परंतु बाहेर जिल्ह्यातून इतर मंडळी गडचिरोलीत येऊ लागल्याने आकडा आढल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही प्रलंबित कामा बाबत देखील माहिती घेऊन ती कामे कशी पूर्ण करता येतील, या संदर्भात देखील बैठक घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा असाल्याने याता पाडा पद्धती असाल्याने त्या पाडांमध्ये मृत्यू दर कसा कमी करता येईल. त्याचबरोबर जनजागृतीचे काम देखील केल्या जाईल, असेही एकथान शिंदे यांनी सांगितले. शिवाय विकासाची प्रलंबित कामांना वेग देण्यासाठी व अग्रक्रम देऊन कामे पूर्ण करण्याचा मानस असल्याचे शिंदे यांनी सांगितले.