गडचिरोली - संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळ आणि 'बस फॉर अस' फाउंडेशनच्यावतीने मुंबई ते हेमलकसापर्यंत 'वारी लालपरीची' हा उपक्रम सुरू होता. महामंडळाच्या या उपक्रमाचा समारोप आज (दि.२०) ला हेमलकसा येथे झाला. लोकबिरादरी दवाखान्याचे संचालक डॉ. दिगंत आमटे यांनी या बसचे हेमलकसा येथे स्वागत केले.
'वारी लालपरीची' चित्ररथ प्रदर्शनाचा हेमलकसा येथे समारोप
संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुंबई ते हेमलकसापर्यंत 'वारी लालपरीची' या उपक्रमाचा शेवट हेमलकसा येथे आज झाला. राज्य परिवहन महामंडळ आणि 'बस फॉर अस' फाउंडेशनच्यावतीने हा उपक्रम सुरू होता.
'वारी लालपरीची' चित्ररथ प्रदर्शनाचा हेमलकसा येथे समारोप
गडचिरोली - संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळ आणि 'बस फॉर अस' फाउंडेशनच्यावतीने मुंबई ते हेमलकसापर्यंत 'वारी लालपरीची' हा उपक्रम सुरू होता. महामंडळाच्या या उपक्रमाचा समारोप आज (दि.२०) ला हेमलकसा येथे झाला. लोकबिरादरी दवाखान्याचे संचालक डॉ. दिगंत आमटे यांनी या बसचे हेमलकसा येथे स्वागत केले.
Intro:'वारी लालपरीची' चित्ररथ प्रदर्शनाचा हेमलकसा येथे समारोप
गडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळ आणि 'बस फार अस' फाउंडेशनच्या वतीने मुंबई ते हेमलकसा पर्यंत 'वारी लालपरीची' या महामंडळाच्या बसचा शेवटचा टप्पा आज (दि.२०) ला हेमलकसा येथे पार पडला. या लालपरीच्या वारीचे उद्घाटन लोकबिरादरी दवाखान्याचे संचालक डॉ. दिगंत आमटे यांचे हस्ते करण्यात आले.Body:'बस फार अस' फाउंडेशन व राज्य परिवहन महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने 'वारी लालपरीची' चित्ररथ प्रदर्शनाची सुरुवात १ जून २०१९ रोजी मुंबई येथून झाली. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी सदर चित्ररथाचे प्रदर्शन झाले.१९४८ पासून २०१९ पर्यंत एसटीच्या बसचा इतिहास व वाटचालीच्या माहितीचा अनोखा खजिना महाराष्ट्रातील विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात आले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आज शेवटचे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडले. या समारोपिय प्रदर्शनामध्ये पहिल्या एसटी बसपासून नविन एसटी बसचे चित्र, प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी बसने आतापर्यंत केलेल्या विविध बदलांची माहिती उपस्थित विद्यार्थी व परिसरातील नागरिकांना करून देण्यात आली.
याप्रसंगी गडचिरोली विभागिय नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, आगार व्यवस्थापक मंगेश पांडे, अहेरीचे आगार व्यवस्थापक युवराज राठोड, यंत्र अभियंता एस.एस.हेडावू, अहेरी आगाराचे लेखाकार चरण चहारे, लोकबिरादरी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरिफ शेख,लोकबिरादरीतील कार्यकर्ते मनोहर येम्पलवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शन पाहण्यासाठी भामरागड येथील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच जिल्हा परिषदेच्या धोडराज, मेडपल्ली, कोयनगुडा, कुमरगुडा, हेमलकसा, टेकला, बेजूर इत्यादी शाळांतील विद्यार्थी -शिक्षक कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.
Conclusion:सोबत विजवल आहेत