ETV Bharat / state

10 लाखांचे उत्पन्न घसरले 80 हजारांवर...गडचिरोली एसटी आगाराचे 215 कर्मचारी सक्तीच्या रजेवर! - गडचिरोली एसटी आगार

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून राज्य परिवहनच्या बसेस बंद आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत 50 टक्के वाहतूक सुरू असली, तरीही पूर्वी दिवसाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या गडचिरोली बस आगाराचे उत्पन्न सध्या 80 हजारांवर घसरले आहे.

राज्य परिवहन मंडळ
10 लाखांचे उत्पन्न घसरले 80 हजारांवर...गडचिरोली एसटी आगाराचे 215 कर्मचारी सक्तीच्या रजेवर!
author img

By

Published : Jul 21, 2020, 7:31 PM IST

गडचिरोली - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून राज्य परिवहनच्या बसेस बंद आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत 50 टक्के वाहतूक सुरू असली, तरीही पूर्वी दिवसाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या गडचिरोली बस आगाराचे उत्पन्न सध्या 80 हजारांवर घसरले आहे. या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचा पगाराचा खर्चही भागवता येत नसल्याने बस आगाराच्या तब्बल 215 कर्मचाऱ्यांना वीस दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

10 लाखांचे उत्पन्न घसरले 80 हजारांवर...गडचिरोली एसटी आगाराचे 215 कर्मचारी सक्तीच्या रजेवर!
राज्यात लॉकडाऊन जाहीर होताच 12 मार्चपासून एसटी सेवा बंद झाली. तेव्हापासून एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे. या संकटातही मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र सध्या परिस्थिती आणखी बिकट होत असल्याने संभाव्य स्थिती बघता राज्य परिवहन महामंडळही मालवाहतुकीच्या क्षेत्रात उतरले आहे. गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी, अहेरी व गडचिरोली या तीन एसटी आगारातील जवळपास 12 बसगाड्या मालवाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्यातही तोटा भरून निघणे कठीण जात आहे. जिल्ह्याअंतर्गत 50 टक्के वाहतुकीला परवानगी असली, तरीही प्रवासी संख्या रोडावली आहे. त्यामुळे नऊ लाखांचे उत्पन्न 80 हजारांवर येऊन पोहोचले आहे. या उत्पन्नामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार व कामगार धोरणानुसार गडचिरोली आगारातील 90 चालक, 97 वाहक, 23 यांत्रिकी कर्मचारी व 5 वाहतूक नियंत्रकांना 20 दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

सध्याची स्थिती बघता पुढील काही दिवस पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. काटकसर करून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती गडचिरोली एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.