ETV Bharat / state

निकालाचे काऊंटडाऊन : गडचिरोली, आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रांमध्ये 48 टेबलवर होणार मतमोजणी - maharashtra election results live update

जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्राच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे साधारणतः 11 ते 12 वाजेपर्यंत तीनही विधानसभा क्षेत्राचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

निकालाचे काऊंटडाऊन
author img

By

Published : Oct 23, 2019, 7:46 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्राच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यात गडचिरोलीत 20, अहेरी व आरमोरी येथे प्रत्येकी 14 अशा 48 टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे साधारणतः 11 ते 12 वाजेपर्यंत तीनही विधानसभा क्षेत्राचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

निकालाचे काऊंटडाऊन

या निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र, गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून मतदानाला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये तब्बल 70.26 टक्के मतदान झाले. यामध्ये अहेरी विधानसभेत 70.34, आरमोरीत 72.13 तर गडचिरोली विधानसभेत 68.54 टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा - गडचिरोली : नक्षलवाद्यांना न जुमानता १३ किलोमीटर प्रवास करत बजावला मतदानाचा हक्क

आरमोरी विधानसभेत 11 उमेदवार रिंगणात होते. अहेरीत 9 तर गडचिरोली विधानसभेत 16 उमेदवार रिंगणात होते. आरमोरी व अहेरी विधानसभेत 14 टेबलवर मतमोजणी होणार असून 200 ते 250 कर्मचारी मतमोजणीच्या कामात राहणार आहेत. गडचिरोली विधानसभेत 20 टेबलवरून मतमोजणी होणार असून 200 ते 250 कर्मचारी काम पाहणार आहेत. मतमोजणी दरम्यान गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी तिनही विधानसभा क्षेत्रांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकूणच मतमोजणीचे काउंटडाउन सुरू झाले असून निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा - गडचिरोलीत निवडणुकीचे कर्तव्य बजावताना एका 'न्यूटन'चा मृत्यू

Intro:निकालाचे काऊंटडाऊन : गडचिरोली, आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रांमध्ये 48 टेबलवर होणार मतमोजणी

गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्राच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून गडचिरोलीत 20, अहेरी व आरमोरी येथे प्रत्येकी 14 अशा 48 टेबलवर मतमोजणी होणार आहे. साधारणतः 11 ते 12 वाजेपर्यंत तीनही विधानसभा क्षेत्राचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Body:निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र गवकऱ्यांनी नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून मतदानाला मोठा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये तब्बल 70.26 टक्के मतदान झाले. यामध्ये अहेरी विधानसभेत 70.34, आरमोरीत 72.13 तर गडचिरोली विधानसभेत 68.54 टक्के मतदान झाले.

आरमोरी विधानसभेत अकरा उमेदवार रिंगणात होते. अहेरीत नऊ तर गडचिरोली विधानसभेत 16 उमेदवार रिंगणात होते. आरमोरी व अहेरी विधानसभेत 14 टेबलवर मतमोजणी होणार असून दोनशे ते अडीचशे कर्मचारी मतमोजणीच्या कामात राहणार आहेत. गडचिरोली विधानसभेत 20 टेबलवरून मतमोजणी होणार असून दोनशे ते अडीचशे कर्मचारी काम पाहणार आहेत. मतमोजणी दरम्यान गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी तिनही विधानसभा क्षेत्रांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकूणच मतमोजणीचे काउंटडाउन सुरू झाले असून निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Conclusion:सोबत wkt आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.