ETV Bharat / state

दिलासादायक..! गडचिरोली जिल्ह्यात पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिक सुखावले

शनिवारी सकाळीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता होती. शुक्रवारी रात्री व आज काही ठिकाणी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

author img

By

Published : Jun 1, 2019, 4:45 PM IST

गडचिरोली - जिल्ह्याच्या दिक्षिण भागात सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवार संध्याकाळपासुनच भामरागड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

दिलासादायक..! गडचिरोली जिल्ह्यात पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिक सुखावले

शुक्रवारी सकाळपासूनच गडचिरोली जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसून येत होता. दुपारनंतर शहरात उन्हाचा कडाका वाढला होता. मात्र, रात्रीच्या सुमारास पुन्हा वातावरण बदलले. भामरागड तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर मुलचेरा तालुक्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.

शनिवारी सकाळीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता होती. शुक्रवारी रात्री व आज काही ठिकाणी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

यावर्षी जिल्ह्याचे तापमान 45 अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहीली आहे. शनिवारी मुलचेरा तालुक्यात 4.4 मिमी तर सिरोंचा तालुक्यात 26 मिमी असे सरासरी 2.5 मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली.

Intro:गडचिरोली जिल्ह्यात पावसाची हजेरी ; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

गडचिरोली : जिल्ह्याचा दक्षिण भाग असलेल्या सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात शनिवारी वादळी वा-यासह पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेने होरपळणा-या नागरीकांना दिलासा मिळाला. काल संध्याकाळपासुनच भामरागड तालुक्यातही भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली.Body:शुक्रवारपासूनच गडचिरोली जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारनंतर तीव्र उन्ह तापल्याने अंगाची लाही लाही होताना अनेक नागरिक त्रस्त झाले. मात्र रात्रीच्या सुमारास पुन्हा वातावरण बदलले. भामरागड तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर मुलचेरा तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला.

आज सकाळी शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी पाऊस न येता ढगाळ वातावरण कायम असल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. यावर्षी जिल्ह्याचे तापमान 45 अंशांवर पोहोचले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता पावसाची प्रतीक्षा लागून आहे. शनिवारी मुलचेरा तालुक्यात 4.4 मिमी तर सिरोंचा तालुक्यात 26 मिमी असे सरासरी 2.5 मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली.

Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.