ETV Bharat / state

येलदळमी डोंगरावर नक्षलवाद्यांचा घातपात उधळला; गडचिरोलीत पोलीस-नक्षल चकमक - नक्षली साहित्य

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील येलदळमी डोंगरावर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी लावलेला अँबूश मोडून काढत सी-60 चे जवान बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 20, 2019, 5:54 PM IST

गडचिरोली - मंगळवारी सकाळी 11 ते 12 वाजताच्या सुमारास महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील येलदळमी डोंगरावर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. नक्षलवाद्यांनी लावलेला अँबूश मोडून काढत सी-60 चे जवान बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे सी-60 जवान एटापल्ली तालुक्यातील गट्टा-कोठी मार्गावरील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील येलदळमी डोंगरावर कोम्बिंग ऑपरेशन राबवत होते. मात्र, याचवेळी नक्षलवाद्यांनी लावून ठेवलेल्या अँबूशमध्ये जवान अडकले. यावेळी नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक उडाली. मोठ्या प्रयत्नानंतर सी-60 जवानांनी अँबूश मोडून काढत बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले.

जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले. तसेच सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून आताही त्या परिसरात पोलीस जवानांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Intro:नक्षलवाद्यांचा घातपात उधळला : गडचिरोलीत पोलीस-नक्षल चकमक

गडचिरोली : मंगळवारी सकाळी अकरा ते बारा वाजताच्या सुमारास महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील येलदळमी पहाडीवर नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी नक्षलवाद्यांनी लावलेला अँबुश मोडून काढत सी-60 चे जवान बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.Body:गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे सी-60 जवान एटापल्ली तालुक्यातील गट्टा- कोठी मार्गावरील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील येलदळमी पहाडीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवत होते. मात्र याचवेळी नक्षलवाद्यांनी लावून ठेवलेल्या अँबुशमध्ये जवान अडकले. यावेळी नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक उडाली. मोठ्या प्रयत्नानंतर सी-60 जवानांनी अँबुश मोडून काढत बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले.

जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले. सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून आताही त्या परिसरात पोलीस जवानांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.Conclusion:फाईल फोटो वापरावे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.