ETV Bharat / state

धक्कादायक! नाकाबंदी करणाऱ्या पोलीस शिपायास कारचालकाने चिरडले - police death

घटनेनंतर कारचालक मोरेश्वर वामन हेडाऊ (रा. गोकुलनगर) गडचिरोली याला अटक करून (एमएच ३३, ८८८) या क्रमांकाची कार ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर हेडाऊ हा गडचिरोली येथील एका नामांकित व्यवसायिकाचा ड्रायव्हर असून तो आपल्या मालकाला नागपूर येथे सोडून गडचिरोली परत येत होता.

केवळराम हिरामण येलोरे (वय ३८)
author img

By

Published : Mar 17, 2019, 1:12 PM IST

गडचिरोली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रसद व दारूचा पुरवठा होऊ नये, म्हणून पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. अशीच नाकाबंदी असताना एका कारचालकाने पोलीस शिपायाला चिरडले. यात पोलीस नायक केवळराम हिरामण येलोरे (वय ३८) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी पहाटे आरमोरी शहरात घडली.

गडचिरोली दारूबंदी असलेला जिल्हा असल्याने इतर जिल्ह्यातून दारू व रसद पुरवठा होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर तसेच ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे. गडचिरोलीवरून जात असताना आरमोरी शहराच्या वेशीवर नाका लावण्यात आला आहे. या नाक्यावर आरमोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिवस-रात्र तैनात आहेत. शनिवारी मध्यरात्री पोलीस नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना नागपूरवरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने नाक्यावर वाहन न थांबवता आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत नायक पोलीस केवळराम येलोरे यांना जबर धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर कारचालक मोरेश्वर वामन हेडाऊ (रा. गोकुलनगर) गडचिरोली याला अटक करून (एमएच ३३, ८८८) या क्रमांकाची कार ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर हेडाऊ हा गडचिरोली येथील एका नामांकित व्यवसायिकाचा ड्रायव्हर असून तो आपल्या मालकाला नागपूर येथे सोडून गडचिरोली परत येत होता.
दरम्यान, दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन आणून त्याने पोलीस शिपायाच्या अंगावर चढविले. मृत पोलीस शिपाई गणेशपूर येथील रहिवासी असून ते आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत असून ठाणेदाराचे रायटर म्हणून काम पाहत होते. आज रविवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अशाच २ घटना घडल्या होत्या. एका घटनेत दारू तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षक चिडे यांना चिरडून ठार केले होते. तर दुसर्‍या घटनेत जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस शिपायास चिरडले होते. पुन्हा अशी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्याने या घटनेने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Intro:धक्कादायक... नाकाबंदी करणाऱ्या पोलिस शिपायास कारचालकाने चिरडले

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रसद व दारूचा पुरवठा होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. अशीच नाकाबंदी असताना एका कारचालकाने पोलीस शिपायाला चिरडले. यात पोलिस नायक केवळराम हिरामण येलोरे (वय 38) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी पहाटे आरमोरी शहरात घडली. Body:गडचिरोली जिल्हा दारूबंदी असलेला जिल्हा असल्याने इतर जिल्ह्यातून दारू व रसद पुरवठा होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर तसेच ठीकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे. गडचिरोलीवरून जात असताना आरमोरी शहराच्या वेशीवर नाका लावण्यात आला आहे. या नाक्यावर आरमोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिवस-रात्र तैनात आहेत. शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना नागपुर वरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने नाक्यावर वाहन न थांबवता आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत नायक पोलीस केवळराम येलोरे यांना जबर धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर कार चालक मोरेश्वर वामन हेडाऊ रा. गोकुलनगर गडचिरोली याला अटक करून एम एच-33- 888 या क्रमांकाची कार ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर हेडाउ हा गडचिरोली येथील एका नामांकित व्यवसायिकाचा ड्रायव्हर असून तो आपल्या मालकाला नागपूर येथे सोडून गडचिरोली परत येत होता. दरम्यान दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन आणून पोलीस शिपायाच्या अंगावर वाहन चढविले. मृतक पोलीस शिपाई गणेशपूर येथील रहिवासी असून तो आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत राहून ठाणेदाराचा रायटर म्हणून काम पाहत होता. आज रविवारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अशाच दोन घटना घडल्या होत्या . एका घटनेत दारू तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षक चिडे यांना चिरडून ठार केले होते. तर दुसर्‍या घटनेत जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस शिपायास चिरडले होते. पुन्हा अशी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्याने या घटनेने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.Conclusion:सोबत अपघातग्रस्त कारचा फोटो व पोलीस शिपायाचा पासपोर्ट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.