गडचिरोली - अहेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी फेसबूकवर पोस्ट टाकत हे स्पष्ट केले आहे.
![आमदार आत्राम यांची फेसबूक पोस्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gad-01-news-mhc10023_25112019125552_2511f_1574666752_177.jpg)
पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबतच राहिलो आहे. मात्र, आजारी असल्याने अन्य आमदारांसोबत उपस्थित राहिलो नसल्याचे सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे केले आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी फेसबूक पोस्टद्वारे केले आहे.
हेही वाचा - लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात