ETV Bharat / state

मुलचेरा तालुक्यात पानटपरीमधून पेट्रोलची अवैधरित्या विक्री - पानटपरीमधून पेट्रोलची अवैधरित्या विक्री

मुलचेरा तालुक्यात एकही पेट्रोल पंप नाही. त्यामुळे या तालुक्यातील वाहनधारकांची पेट्रोलची गरज भागवण्यासाठी चक्क किराणा दुकान व पानटपरीवर पेट्रोलची विक्री केली जात आहे. हा तालुका जंगल व्याप्त क्षेत्रात असून अहेरी, चामोर्शी, एटापल्ली या तालुक्याची सीमा लागून आहे.

पानटपरीमधून पेट्रोलची अवैधरित्या विक्री
author img

By

Published : Nov 14, 2019, 5:00 PM IST

गडचिरोली - पानटपरीवर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तर किराणा दुकानात दैनंदिन आवश्यक वस्तूंची सर्वसामान्यपणे विक्री केली जाते. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात याचं पानटपरी व किराणा दुकानात चक्क पेट्रोल व डिझेलची विक्री केली जात आहे. हा धक्कादायक प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना प्रशासन मात्र गप्प आहे.

पानटपरीमधून पेट्रोलची अवैधरित्या विक्री

मुलचेरा तालुक्यात एकही पेट्रोल पंप नाही. त्यामुळे या तालुक्यातील वाहनधारकांची पेट्रोलची गरज भागवण्यासाठी चक्क किराणा दुकान व पानटपरीवर पेट्रोलची विक्री केली जात आहे. हा तालुका जंगल व्याप्त क्षेत्रात असून अहेरी, चामोर्शी, एटापल्ली या तालुक्याची सीमा लागून आहे.

हेही वाचा - नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे रिक्त 183 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

तालुका मुख्यालय असलेल्या मुलचेरा येथील वाहनधारकांना पेट्रोल भरायचे असल्यास त्यांना आलपल्ली, एटापल्ली, आष्टी किंवा चामोर्शी येथे जावे लागते. यासाठी त्यांना आष्टी येथे जाण्यासाठी 20 किलोमीटर, अल्लापल्ली येथे जाण्यासाठी 35 किलोमीटर, एटापल्ली येथे जाण्यासाठी 35 किलोमीटर तर चामोर्शी येथे जाण्यासाठी 40 किलोमीटर अंतर पार करावे लागते. त्यामुळे 100 रुपयाचे पेट्रोल भरण्यासाठी 100 ते 200 रुपयाचा पेट्रोल खर्च करा, अशी वेळ या तालुक्यातील वाहनधारकांवर आली आहे. त्यामुळे या तालुक्यातील अनेक किराणा दुकान व पान टपरी चालक मोठ्या ड्रममध्ये किंवा कॅनमध्ये पेट्रोल आणून चिल्लर विक्री करत असतात. मात्र, यासाठी दरही अधिकच आकारले जाते.

वाहनधारकांना 1 लिटर पेट्रोलसाठी 100 रुपये मोजावे लागतात. तर अर्धा लिटरसाठी 50 रुपये दर आकारले जातात. यासाठी पाण्याची बॉटल किंवा शीतपेयाची बॉटल या मापाचा वापर केला जातो. पेट्रोल सारख्या अतिज्वलनशील पदार्थांची विक्री पंपाबाहेर केली जात असेल तर तो गुन्हा ठरतो. मात्र, या तालुक्यात गेल्या 25 वर्षापासून पेट्रोलची अशा प्रकारे विक्री सुरू असताना प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.

हेही वाचा - परतीच्या पावसाने गडचिरोलीत 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

या तालुक्यात पेट्रोल पंप उभारणीसाठी प्रशासनाने शासनाकडे अनेक प्रस्ताव पाठवले. मात्र, पेट्रोल पंप उभारणीसाठी तालुक्यातील एकाही नागरिकांनी निविदा भरली नाही. त्यामुळे या तालुक्यात पेट्रोल पंप उभारण्याची मागणी प्रलंबित आहे. या तालुक्यात 11 ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्याचे प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे नुकतेच पाठविले. पेट्रोल पंप उभारणे हे पेट्रोलियम कंपनीचे काम असून प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजय मिस्कीन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

Intro:Most exclusive

धक्कादायक... चक्क किराणा दुकान, पानटपरीमधून पेट्रोलची विक्री

गडचिरोली : पानटपरीवर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तर किराणा दुकानात दैनंदिन आवश्यक वस्तूंची सर्वसामान्यपणे विक्री केली जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात याचं पानटपरी व किराणा दुकानात चक्क पेट्रोल व डिझेलची विक्री केली जात आहे. हा धक्कादायक प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना प्रशासन मात्र गप्प आहे.Body:15 ऑगस्त 1992 रोजी मुलचेरा तालुक्याची निर्मिती झाली. हा तालुका निर्मित होऊन आज 25 वर्षाचा काळ लोटला. मात्र तालुक्यात कुठेच पेट्रोल पंप नसलेला गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा हा एकमेव तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यातील वाहनधारकांची पेट्रोलची गरज भागवण्यासाठी चक्क किराणा दुकान व पानटपरीवर पेट्रोलची विक्री केली जात आहे. हा तालुका जंगल व्याप्त क्षेत्रात असून अहेरी, चामोर्शी, एटापल्ली या तालुक्याची सीमा लागून आहे.

तालुका मुख्यालय असलेल्या मुलचेरा येथील वाहनधारकांना पेट्रोल भरायचे असल्यास त्यांना आलपल्ली, एटापल्ली, आष्टी किंवा चामोर्शी येथे जावे लागते. यासाठी त्यांना आष्टी येथे जाण्यासाठी 20 किलोमीटर, अल्लापल्ली येथे जाण्यासाठी 35 किलोमीटर, एटापल्ली येथे जाण्यासाठी 35 किलोमीटर तर चामोर्शी येथे जाण्यासाठी 40 किलोमीटर अंतर पार करावे लागते. त्यामुळे 100 रुपयाचा पेट्रोल भरण्यासाठी 100 ते 200 रुपयाचा पेट्रोल खर्च करा, अशी वेळ या तालुक्यातील वाहनधारकांवर आली आहे. त्यामुळे या तालुक्यातील अनेक किराणा दुकान व पान टपरी चालक मोठ्या ड्रममध्ये किंवा कॅनमध्ये पेट्रोल आणून चिल्लर विक्री करत असतात. मात्र यासाठी दरही अधिकच आकारले जाते. 

एक लिटर पेट्रोलसाठी सरळ शंभर रुपये मोजावे लागत असून अर्धा लिटरसाठी पन्नास रुपये दर आकारले जाते. यासाठी पाण्याची बॉटल किंवा शीतपेयाची बॉटल या वजन मापाचा वापर केला जातो. ज्याला पेट्रोल हवा आहे तो दुकानासमोर वाहन लावून बॉटलद्वारे पेट्रोल खरेदी करतो आणि वाहनात टाकतो. तालुक्यात कुठेच पेट्रोल पंप नसल्याने नाईलाजास्तव वाहनधारकांना शंभर रुपये मोजून एक लिटर पेट्रोल खरेदी करावी लागत आहे. पेट्रोल सारख्या अति ज्वलनशील पदार्थांची विक्री पंपाबाहेर केली जात असेल तर तो गुन्हा ठरतो. मात्र या तालुक्यात गेल्या 25 वर्षापासून पेट्रोलची अशा प्रकारे विक्री सुरू असताना प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. याला कारणही तसेच आहे. 

या तालुक्यात पेट्रोल पंप उभारणीसाठी प्रशासनाने शासनाकडे अनेक प्रस्ताव पाठवले. मात्र पेट्रोल पंप उभारणीसाठी तालुक्यातील एकाही नागरिकांनी निविदा भरली नाही. त्यामुळे या तालुक्यात पेट्रोल पंप उभारण्याची मागणी प्रलंबित आहे. या तालुक्यात 11 ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्याचे प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे नुकतेच पाठविले. पेट्रोल पंप उभारणे हे पेट्रोलियम कंपनीचे काम असून प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजय मिस्कीन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.Conclusion:सोबत व्हिज्युअल आणि पुरवठा अधिकारी संजय मिस्कीन व जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शहा यांचा बाईट आहे.

Pls पॅकेज करावे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.