ETV Bharat / state

अखेर गडचिरोलीच्या 'गोंडवाना'ला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता; मॉडेल कॉलेजही होणार हस्तांतरित - gondwana university gets ugc

नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन २०११ साली गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. परंतु, गोंडवानाकडे विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नव्हती तर, येथे सुरू करण्यात आलेले मॉडेल कॉलेजही नागपूर विद्यापीठातच कायम होते. मात्र, आता गोंडवाना विद्यापीठाला युजीसीची मान्यता मिळाली असून मॉडेल कॉलेज हस्तांतरित होण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

गोंडवाना विद्यापीठ
गोंडवाना विद्यापीठ
author img

By

Published : Sep 17, 2020, 3:51 PM IST

गडचिरोली - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभाजनातून स्थापन करण्यात आलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाला अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली आहे. गेल्या आठवड्यात आयोगाच्या बैठकीत गोंडवाना विद्यापीठाच्या मान्यतेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गडचिरोली येथे सुरू असलेले नागपूर विद्यापीठाचे मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाकडे हस्तांतरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाची स्थापना २७ सप्टेंबर २०११ रोजी करण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या उपकेंद्रालाच विद्यापीठात परिवर्तीत करण्यात आले होते. चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील 200हुन अधिक महाविद्यालयांचा या विद्यापीठात समावेश करण्यात आला होता. त्यावेळी गोंडवाना विद्यापीठाकडे केवळ दहा एकर जागा आणि सध्या आहे ती प्रशासकीय इमारतच होती. विद्यापीठ स्थापन करताना राज्य सरकारने एक रुपयाचाही निधी दिला नाही किंवा जमीनदेखील देण्यात आलेली नाही. तर, नागपूर विद्यापीठाने कधीकाळी सुरू केलेले अवघे चार पदव्युत्तर विभाग आणि केंद्र सरकारने मंजूर केलेले मॉडेल कॉलेज येथे कार्यरत होते.

दरम्यान, तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठाच्या व्हिजन डॉक्युमेंटची जबाबदारी ऑब्झर्व रिसर्च फाउंडेशनला दिली. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे २०० एकर जमीन, २२ पदव्युत्तर विभाग आणि १७२ पदे मंजूर झालीत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सगळ्या निकषात विद्यापीठ पात्र ठरत असल्याचा दावा करत मान्यता देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावासोबतच विद्यापीठात पदभरतीदेखील होणार होती. परंतु काही कारणांनी पदभरती झाली नाही. तरीही विद्यापीठ अनुदान आयोगाने गोंडवानाला १२ बी अंतर्गत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत अनुदान प्राप्त करता येणार आहे. यासोबतच संलग्नीत कॉलेजेसनादेखील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध योजनांतर्गत निधी प्राप्त होणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या कार्यकक्षेत्रात गडचिरोली हा आदिवासी जिल्हा येत असल्याने केंद्र सरकारने १२ व्या वित्तीय योजनेत आदिवासींना उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने गडचिरोली येथे मॉडेल कॉलेज मंजूर केले. कालांतराने नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. परंतु, गोंडवानाकडे विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने मॉडेल कॉलेज नागपूर विद्यापीठातच कायम होते. मात्र, नागपूर विद्यापीठाकडून या कॉलेजच्या विकासासाठी काहीही करण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून कॉलेज बंद आहे. तेव्हा मॉडेल कॉलेज गोंडवानाला हस्तांतरित करण्यात यावे, असा ठराव गोंडवानातील विविध समित्यांनी केला. त्यानुसार नागपूर विद्यापीठानेदेखील कॉलेज हस्तांतरित करण्यास हरकत नसल्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारनेही त्याला मंजुरी दिली आहे. आता गोंडवाना विद्यापीठाला युजीसीची मान्यता मिळाली आहे, त्यामुळे मॉडेल कॉलेज हस्तांतरित होण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - लाहेरी मार्गावर आढळले नक्षली बॅनर; क्रांतिकारी सप्ताह पाळण्याचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.