ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मान - मुलचेरा

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षिका सपना शंकर अडीचेर्लावार आणि शिक्षक अशोक बोरकुटे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षक
author img

By

Published : Aug 20, 2019, 11:22 AM IST

गडचिरोली - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजिस्टर ट्रस्ट संस्थेच्या प्रेरणेने आणि खासगी इव्हेन्ट मॅनेजमेंट एजन्सी इन्फोटेक फीचर्सच्या पुढाकाराने मुबंई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षिका सपना शंकर अडीचेर्लावार आणि शिक्षक अशोक बोरकुटे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त शिक्षक

राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०१९ साठी यापूर्वीच प्राथमिक शिक्षिका सपना अडीचेर्लावार आणि प्राथमिक शिक्षक अशोक बोरकुटे यांची अंतिम निवड करण्यात आली होती. १८ ऑगस्टला पश्चिम मुंबई येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, सभागृहात आयोजित महासंमेलनात त्यांना सन्मान चिन्ह, लक्षवेधी गौरव पदक, विशेष महावस्त्र, खास मानपत्र व मानकरी बॅच देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी ह.भ.प. शामसुंदर महाराज, महास्वामी, रंगनाथ जोशी, रमेश आव्हाळ, अरुणा परब, मनीषा घार्गे, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे, के. एल. गोगावाले, अमोल सुपेकर यांच्यासह अन्य मान्यवर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले शेकडो शिक्षक उपस्थित होते. अत्यंत दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांचा मुंबई येथे सन्मान झाल्याने शिक्षक वर्गातून आणि मित्रपरिवारातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Intro:गडचिरोली जिल्ह्यातील दोन शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मान

गडचिरोली : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजिस्टर ट्रस्ट संस्थेच्या प्रेरणेने आणि खाजगी इव्हन्ट मॅनेजमेंट एजन्सी इन्फोटेक फीचर्सच्या पुढाकाराने मुबंई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासम्मेलनात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षिका सपना शंकर अडीचेर्लावार आणि शिक्षक अशोक बोरकुटे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.Body:राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासम्मेलन 2019 करीता यापूर्वीच प्राथमिक शिक्षिका सपना अडीचेर्लावार आणि प्राथमिक शिक्षक अशोक बोरकुटे यांची अंतिम निवड करण्यात आली होती. 18 ऑगस्ट रोजी पश्चिम मुंबई येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, सभागृहात आयोजित महासम्मेलनात त्यांना सन्मान चिन्ह, लक्षवेधी गौरव पदक, विशेष महावस्त्र, खास मानपत्र व मानकरी बॅच देऊन सन्मानित करण्यात आला.

यावेळी ह.भ.प.श्री शामसुंदर महाराज, प.आ.महास्वामी, रंगनाथ जोशी, रमेश आव्हाळ , अरुणा परब, मनीषा घार्गे, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ऍड कृष्णाजी जगदाडे, के.एल.गोगावाले, अमोल सुपेकर यांच्यासह अन्य मान्यवर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले शेकडो शिक्षक उपस्थित होते. अत्यंत दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांचा मुंबई येथे सन्मान झाल्याने शिक्षक वर्गातून आणि मित्रपरिवारातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.