ETV Bharat / state

गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची ३ जानेवारीला निवड - Gadchiroli zp president vice president election

ग्रामविकास विभागाच्या १० डिसेंबरच्या पत्रानुसार, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २० डिसेंबरला एक पत्र काढले आहेत. यात ३ जानेवारी २०२० ला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी विशेष सभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

Zilha parishad, Gadchiroli
जिल्हा परिषद, गडचिरोली
author img

By

Published : Dec 21, 2019, 6:13 PM IST

गडचिरोली - येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक ३ जानेवारीला घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या १० डिसेंबरच्या पत्रानुसार, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २० डिसेंबरला एक पत्र काढले आहेत. यात ३ जानेवारी २०२० ला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी विशेष सभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहात ही विशेष सभा होणार आहे. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) धनाजी पाटील यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

हेही वाचा - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस; शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी सप्टेंबर २०१९ मध्ये संपला. मात्र, त्यापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक आणि नंतर झालेली विधानसभा निवडणूक यांच्या आचारसंहितेत 3 महिने गेल्याने जिल्हा परिषदांना विकासकामे करताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालिन सरकारने जिल्हा परिषदांना १२० दिवसांची मुदतवाढ दिली होती. मुदतवाढ २० जानेवारीला संपत आहे. त्यापूर्वीच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतिपदांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होणार आहे.

हेही वाचा - 'जनादेशाचा अनादर करणारे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही'

जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-आविसं यांची सत्ता आहे. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे २०, काँग्रेस १५, आदिवासी विद्यार्थी संघ ७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, राष्ट्रीय समाज पक्ष-२ व ग्रामसभांचे २ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचा अध्यक्ष आणि २ सभापती, आविसंचा १ उपाध्यक्ष आणि १ सभापती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा १ सभापती विराजमान आहे. मात्र, राज्यात झालेले सत्तांतर लक्षात घेता या निवडणुकीत भाजपला सत्ता टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल, असे दिसत आहे.

Intro:गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची ३ जानेवारीला निवड

गडचिरोली : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३ जानेवारीला घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.Body:ग्रामविकास विभागाच्या १० डिसेंबरच्या पत्रानुसार, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २० डिसेंबरला एक पत्र काढले असून, ३ जानेवारी २०२० ला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी विशेष सभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहात ही विशेष सभा होणार असून, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) धनाजी पाटील यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी सप्टेंबर २०१९ मध्येच संपला. परंतु त्यापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक व नंतर झालेली विधानसभा निवडणूक यांच्या आचारसंहितेत तीन महिने गेल्याने जिल्हा परिषदांना विकासकामे करताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालिन सरकारने जिल्हा परिषदांना १२० दिवसांची मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ २० जानेवारीला संपत आहे. त्यापूर्वीच अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतिपदांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३ जानेवारीला होणार आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेत सद्य:स्थितीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-आविसं यांची सत्ता आहे. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे २०, काँग्रेस १५, आदिवासी विद्यार्थी संघ ७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, राष्ट्रीय समाज पक्ष-२ व ग्रामसभांचे २ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचा अध्यक्ष व दोन सभापती, आविसंचा उपाध्यक्ष व एक सभापती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सभापती विराजमान आहे. परंतु राज्यात झालेले सत्तांतर लक्षात घेता या निवडणुकीत भाजपला सत्ता टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल, असे दिसत आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.