ETV Bharat / state

महिलांवरील अत्याचाराला भाजप सरकारच जबाबदार, गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून बॅनरबाजी - गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा बॅनरबाजी गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा बॅनरबाजी केली आहे. टापल्ली तालुक्यातील उडेरा ते बुर्गी मार्गावर उडेरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या एका नाल्यावर बॅनर आणि पत्रक टाकले आहे. यामध्ये ८ ते १० मार्चदरम्यान महिला दिन साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Gadchiroli Naxalite again poster
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा बॅनरबाजी गडचिरोली
author img

By

Published : Mar 5, 2020, 12:11 PM IST

गडचिरोली - नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा बॅनरबाजी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एटापल्ली तालुक्यातील उडेरा ते बुर्गी मार्गावर उडेरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या एका नाल्यावर बॅनर आणि पत्रक टाकले आहे. ८ ते १० मार्चदरम्यान महिला दिन साजरा करावा. तसेच 10 मार्च रोजी गावा-गावांत कार्यक्रम घेण्याचे आवाहन यात केले आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराला भाजप सरकारच जबाबदार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. क्रांतीकारी महिला संघटना गडचिरोली, भाकपा माओवादी पेरमिली एरिया कमेटी असा उल्लेख या बॅनरवर आहे.

Gadchiroli Naxalite again poster
नक्षलवाद्यांनी टाकलेली पत्रके

तत्पूर्वी 3 मार्च रोजी आलापल्ली-भामरागड मुख्य मार्गावरील ताडगाव जवळ अशाच प्रकारे बॅनर, पत्रक टाकण्यात आले होते. तसेच रस्त्याच्या मधोमध डमी भूसुरुंग लावून ठेवला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णत बंद पडली होती. पोलिसांना ही बाब लक्षात येताच बॅनर काढण्यात आले. त्यानंतर ताडगाव येथे विद्यार्थी व महिलांनी नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॅनरची होळी करून आक्रोश व्यक्त केला.

Gadchiroli Naxalite again poster
नक्षलवाद्यांनी टाकलेली पत्रके

दरम्यान, काल (बुधवारी) कुरखेडा भूसुरुंग स्फोट घटनेचा मास्टर माईंड उत्तर गडचिरोली डीविजनचा प्रमुख नक्षलवादी दिनकर गोटा व त्याच्या पत्नीला गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष पथकाने अटक केली. तर दोन दिवसापूर्वी उत्तर गडचिरोली डिव्हिजनच्याच विलास कोल्हा याने एके-47 रायफलसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतरही नक्षलवाद्यांकडून बॅनर व फलकबाजी सुरू असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.