गडचिरोली - राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाच्या १५ जवानांना वीरमरण आले. यामध्ये एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला. घटना घडल्याच्या काही मिनिटातच एक स्थानिक पत्रकार घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी काय होती घटनास्थळावरची दृश्ये.. याबाबत त्यांच्याशी खास बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी....
याबाबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी स्थानिक पत्रकाराशी चर्चा केली. तेव्हा त्या घटनेबाबत त्या पत्रकाराने नाव न सांगण्याच्य अटीवर माहिती दिली.
जांभूळखेडा परिसरात स्फोट झाला असल्याची माहिती 'त्या' स्थानिक पत्रकाराला मिळाली. तेव्हा तो १५ मिनिटात घटनास्थळी पोहोचला. तेव्हा त्याने एक पांढऱ्या रंगाची गाडी जी स्फोटाने तुकडे-तुकडे झालेली पाहिली. तसेच त्याने रस्त्यावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह पाहिले. त्यांच्या कपड्यावरुन ते पोलीस असल्याचे त्याने ओळखले.
घटना घडल्यानंतर बराच कालावधी उलटला तरी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले नसल्याचे त्या पत्रकाराने सांगितले. जवान ज्या गाडीने जात होते, त्या गाडीचे स्फोटात तीन-चार तुकडे झाले होते. स्फोट झालेल्या ठिकाणी भला मोठ्ठा खड्डा पडला होता. असेही त्याने सांगतले.