गडचिरोली - अहेरी तालुक्यातील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ११वर गेली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 42 रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
आज अहेरी शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तिला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणाला प्रशासनाने तत्काळ प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले. सदर व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली. कोरोनाची लागण झालेला हा व्यक्ती शहरातील किराणा व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे अहेरी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 54 रुग्ण आढळून आले. यातील ४२ जण बरे झाले तर केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 4 हजार 201 जण क्वारंटाईन असून 11 अॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या 668 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आज दिवसभरात तपासणीसाठी 262 नमुने घेण्यात आले. आत्तापर्यंत 4 हजार 835 ️नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात ५ प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत.
कोरोनाची तालुकानिहाय आकडेवारी(एकूण बाधित रूग्ण-बरे झालेले रूग्ण-सध्या सक्रिय रूग्ण)
१) गडचिरोली – ८-५-३
२) आरमोरी – ४-३-१
३) वडसा – १-०-१
४) कुरखेडा – ९-९-०
५) कोरची – १-१-०
६) धानोरा – ३-२-१
७) चामोर्शी – ५-४-१
८) मूलचेरा –७-४-३
९) अहेरी – ४-३-१
१०) सिरोंचा –१-०-०(१ मृत्यू)
११) एटापल्ली – ८-८-०
१२) भामरागड –३-३-०
एकुण – ५४-४२-११(१ मृत्यू)