ETV Bharat / state

गडचिरोली-चिमूर लोकसभाः चार बूथवर सुरक्षेच्या कारणाने मतदान नाही

गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर 'निशानी' दाखवताना मतदार
author img

By

Published : Apr 11, 2019, 11:31 PM IST

गडचिरोली - गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी ६९ टक्के मतदान झाले. मात्र, या मतदारसंघातील अतिदुर्गम असलेल्या वाटेली, गरदेवाडा, पुष्पोटी, वांगेपुरी या ठिकाणी निवडणूक कर्मचारी मतदान घेण्यासाठी पोहचू शकले नाहीत. सुरक्षेच्या कारणामुळे या चारही बूथवर मतदान झाले नाही. त्यामुळे येथे नंतर मतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.

मतदानाच्या प्रक्रिया सुरू असताना

गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सर्व मतदान केंद्रावर सुरुवातीला 'मॉकपोल' घेण्यात आले. तर ९५ केंद्रावर 'वेबकास्टींग' करण्यात आले.

एटापल्ली तालुक्यातील कसनसुर मौजा वागेझरी जवळ आईडी ब्लास्ट, गट्टा जांबीया गावाच्या जवळ तसेच पुरसलगोंदी गावाच्याजवळ झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.

Intro:गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सरासरी 69 टक्के मतदान

गडचिरोली : गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात रात्री 9.00 वाजतापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरासरी 69 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.Body:गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात सकाळी 7.00 वाजल्यापासून सर्वत्र शांततेत मतदानास सुरुवात झाली. सर्व मतदान केंद्रावर सुरुवातीला मॉकपोल घेण्यात आले. 95 केंद्रावर वेबकास्टींग करण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील कसनसुर जवळील मौजा वागेझरी जवळ आईडी ब्लास्ट, गट्टा जांबीया गावाच्या जवळ तसेच पुरसलगोंदी गावाच्या जवळ झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटना वगळता जिल्हयात व मतदारसंघात अन्यत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.

अतिदुर्गम असलेल्या वाटेली, गरदेवाडा, पुष्पोटी, वांगेपुरी येथे निवडणूक कर्मचारी पोहचू शकले नाहीत. सुरक्षेच्या कारणामुळे या चारही बूथवर मतदान झाले नाही. त्यामुळे येथे नंतर मतदान घेण्यात येणार आहे, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. Conclusion:बातमी अपडेट करावी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.