गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील राजगोपालपूर येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा आज पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शिल्पा राय, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गेडाम, विनोद गौरकार, सरपंच शिलताई गोहणे उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना अंमलात आणल्या. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे भाजप सरकारचे पूर्ण लक्ष शेतकरी बांधवांवर आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
खरीप व रब्बी पिकासाठी २ टक्के विमा सरकारने केला आहे. पूर्वी ५० टक्के पिकाचे नुकसान झाले तर मदत मिळत होती. मात्र, आत्ता २५ टक्के नुकसान झाले तरी नुकसान भरपाई देण्यात यावी, असा कायदा भाजपा सरकारने लागू केला आहे. तलावाचे खोलीकरण करणे, सिंचन विहिरी करता मी प्रयत्न करत असल्याचे खासदार नेते म्हणाले.