ETV Bharat / state

पूरपीडितांच्या मदतीला धावले सीआरपीएफ जवान; जारेगुडावासीयांना मदतीचा हात - update flood news in gadchiroli

भामरागड तालुक्यात सर्वाधिक पुराचा फटका बसला. तब्बल आठ दिवस जगाशी संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाल्याने भामरागड नदीचे पलीकडचे जारेगुडा येथील नागरिकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे पोट कसे भरायचे ? असा प्रश्न उपस्थित झाला.

flood
पूरपीडिताना मदत करताना जवान
author img

By

Published : Aug 25, 2020, 6:43 PM IST

गडचिरोली - मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घतले आहे. त्यात भामरागड तालुक्यात सर्वाधिक पुराचा फटका बसला. तब्बल आठ दिवस जगाशी संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाल्याने भामरागड नदीपलीकडच्या जारेगुडा येथील नागरिकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे पोट कसे भरायचे ? असा प्रश्न उपस्थित झाला. अशा वेळेस केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 37 बटालियनच्या जवानांंनी साडी, ब्लांकेट, कपडे आदी जीवनावश्यक वस्तू देवून नागरिकांना मदतीचा हात दिला.

भामरागड तालुक्यात 15 ऑगस्टपासून झालेल्या मुसळधार पावसाने इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा या तीन प्रमुख नद्यांंसह भांडीया नदी नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. भामरागडसह अनेक गावांना पुराच वेढा बसला होता. आठ दिवस घराबाहेर पडणे शक्यच नव्हते. अशावेळी जारेगुडावासीयांच्या रोजमजुरीवर परिणाम झाला. अशावेळी केंद्रीय राखीव दलातर्फे काहीतरी मदत करण्याचे सूचना 37 बटालियनचे कमाडन्ट श्रीराम मीना यांनी भामरागड येथे कर्यरत आपल्या जवानांना दिल्या.

भामरागड येथील सीआरपीएफच्यावतीने जारेगुडा येथील आदिवासी बांधवांना साडी चोळी ब्लांकेट आदी जीवनावश्यक वस्तु देऊन मदत केली. यावेळी सीआरपीएफचे निरीक्षक प्रवीण प्रसाद, भामरागडचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गजानन पडटकर, उपनिरीक्षक मंगेश कराडे, ज्ञानेश्वर झोल नगर पंचायत सभापती संगीता गाडगे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.