ETV Bharat / state

भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट - Gadchiroli Latest News

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी रविवारी भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांना भेटी देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पारंपरिक पध्दतीने सेंद्रिय शेती करत असलेल्या पल्ली गावाला भेट दिली. तसेच त्यांनी आपल्या दौऱ्यात लाहेरी, होड्री, कुमारगुडा व गुंडेनूर येथील गावांना भेटी दिल्या.

भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

author img

By

Published : Jan 24, 2021, 8:45 PM IST

गडचिरोली - जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी रविवारी भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांना भेटी देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पारंपरिक पध्दतीने सेंद्रिय शेती करत असलेल्या पल्ली गावाला भेट दिली. तसेच त्यांनी आपल्या दौऱ्यात लाहेरी, होड्री, कुमारगुडा व गुंडेनूर येथील गावांना भेटी दिल्या.

आदिवासी जतन केंद्राची पाहणी

या भेटीत पल्ली आणि होड्री गावात बसून पारंपारिक पध्दतीच्या जेवणाचा आस्वाद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. पल्ली गावात ताडगाव-पल्लीला जोडणाऱ्या कच्च्या मार्गावरील पूल बांधण्यासाठी नियोजन करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले, व संबंधितांना याबाबत सूचना केल्या. गावातील समस्यांबाबत त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी चर्चा केली. पल्ली गावातील सेंद्रिय शेतीला प्रमाणपत्र देण्याबाबत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. जेणेकरून या शेतीबाबत सर्वदूर माहिती होऊन, त्याचा संबंधित शेतकऱ्यांना फायदा होईल. पल्ली गावात तलाव बांधण्यासाठी देखील त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यामुळे सेंद्रिय शेतीला मुबलक पाण्याची व्यवस्था होईल असे ते यावेळी म्हणाले. प्रकल्प कार्यालयामार्फत सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी गाडी मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी विभागाला दिले आहेत. यातून सेंद्रीय माल विकण्यास मदत होणार आहे. त्यानंतर त्यांनी कुमरगुडा येथील प्रस्तावित आदिवासी जतन केंद्राची पाहणीही आपल्या भामरागड दौऱ्यात केली.

घनकचरा गाडयांचे लोकार्पण

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत भामरागड नगरपंचायतमध्ये विविध व्यवस्थेची पाहणी व आपत्ती विभागातील बोटीमधून नौका विहार करून, दरवर्षी होणाऱ्या पूरस्थिती बाबतची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. नगरपंचायतध्ये नव्याने आलेल्या घनकचरा गाडयांचे लोकार्पण केले. तसेच व्यायाम शाळा लोकर्पण, नव्याने झालेल्या घनकचरा डेपोचे भूमिपूजन त्यांनी केले. भामरागड येथील त्रिवेणी संगमावर भेट देवून तेथील सुधारणांबाबत आरएफओ बरोबर चर्चा केली व आराखडा तयार करण्याबाबत सूचना दिल्या. याचवेळी भामरागड मधील सर्व विभाग प्रमुखांबरोबर विकासात्मक कामांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी तालुक्याच्या समस्या जाणून घेतल्या व विकासावर आधारीत कामांचे नियोजन करण्यासाठी उपस्थितांना सूचना केल्या.

दुर्गम भागात पारंपरिक पध्दतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लाहेरी भागातील विविध गावांना भेटी दिल्या. भुसेवाडा गावाला जोडणाऱ्या बेली पूलाचीही त्यांनी पाहणी केली. गुंडेनूर नाल्याची पाहणी करून त्या ठिकाणी पूल बांधकामाबाबत संबंधितांना निर्देश दिले. याच नाल्यामूळे काही महिन्यांपूर्वी पावसाळयात गरोदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तिच्या घरी भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. तसेच गुंडेनूर अंगणवाडीत भेट देवून तेथील मुलांशी संवादही साधला. त्यानंतर होड्री गावातील बेली ब्रीजच्या कामाला भेट देवून कामाची पाहणी केली. होड्री गावात आदिवासी नागरिकांनी पारंपारिक पध्दतीने जिल्ह्याधिकाऱ्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी रेला आदिवासी नृत्यही सादर करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.