गडचिरोली - जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या दोन ग्रामपंचायतीसह रिक्त असलेल्या 183 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढच्या महिन्यात 8 डिसेंबर रोजी या सर्व निवडणुका होणार आहेत.
हेही वाचा... शबरीमला प्रकरणी पुनर्याचिका आता संविधानिक पीठाकडे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
गडचिरोली जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त गावे आहेत. या ग्रामपंचायतींपैकी 183 ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या जागा विविध कारणांमुळे रिक्त आहेत. त्यामध्ये माओवाद्यांच्या कारवाया, तसेच अतिसंवेदनशील अशा काही ग्रामपंचायतीमध्ये माओवाद्यांच्या दहशतीमुळे, सदस्य पदासह सरपंच पदासाठी स्थानिक नागरिक उभे राहत नाही. परिणामी अशा जागा रिक्त आहेत.
हेही वाचा... सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस
काही ठिकाणी आरक्षित असलेल्या प्रवर्गाचे उमेदवार मिळत नाही, अनेकांकडे जातीचे प्रमाणपत्रही नाही, त्यामुळे त्या जागा रिक्त असतात, अशा रिक्त जागांवर सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणे आवश्यक असते. त्यामुळे प्रशासनाने या 183 ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीमधील सदस्य पदासह अहेरी तालुक्यातील पल्ले आणि येडमपल्ली या दोन मोठ्या ग्रामपंचायतीसाठी देखील निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी येणाऱ्या 16 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 22 नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 25 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर ८ डिसेंबरला मतदान होणार आहे आणि ९ डिसेंबरला मतमोजणी होईल.