गडचिरोली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनच्या नियमावली तयार केली आहे. मात्र, शासनाने घालून दिलेल्या या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर भामरागड नगर पंचायत आणि मुक्तीपतने संयुक्तरित्या कडक पाऊल उचलले आहे. मंगळवारपासुन शहरात मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे भामरागड शहरात खर्रा शौकिन युवकांचे दाबे दणाणले आहे. या बाबीची भामरागड नगर पंचायत प्रशासन आणि मुक्तीपत संघटनाने गंभीर दखल घेतली आहे. यानुसार मुख्याधिकारी सुरज जादव आणि मुक्तीपतचे चिन्नु महका यांच्या नेतृत्वात न. प. सर्व कर्मचारी यांनी कर्मचारी यांचे गटकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात मास्क न घालता सैराटपणे फिरणारे, मास्क न लावता दुकान चालविणे, दुकानात गर्दी करण्यांवर मागील चार दिवसांत 172 लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 27 हजार 340 रुपये वसुल करण्यात आला. तसेच मास्क न लावता फिरल्यास आणखी मोठी कारवाई करण्यात येईल, अशी तंबी नागरिकांना देण्यात आली आहे.
लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हा सिमेवरील चेकपोस्ट हटवण्यात आल्याने जनतेचा सर्वत्र संचार सुरु झाला आहे. त्यात जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात लोक बेजाबदारीने वागताना दिसत आहेत. येथील लोक विना मास्कने फिरत आहेत. इतकेच नव्हे तर खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकत आहेत. यासर्वांचा कोरोनाच्या रुग्णसंख्यावाढीवर मोठा परिणाम होत आहे.
भामरागडवासियांनी 'आपली शहर आपली जबाबदारी' म्हणून इतर जिल्ह्यातून आणि राज्यातुन शहरात येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन प्रशासनाला माहिती द्यावी. तसेच स्वतःच खबरदारी घ्यायची आहे. घराबाहेर पडताना मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षित अंतर ठेवूनच दैनंदिन आणि कार्यलयीन कामे करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तर नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ.सुरज जादव व मुक्तीपतचे चिन्नु महका, शासकीय अधिकारी आशीष बारसागडे, लिपीक जीतेंद्र मडावी, आबीद शेख, मतकुरशह कोडापे, रवी गुडीपाका, मनीष मडावी, नरेश मडावी, महेंद्र कुसराम, घनश्याम भलवे, राजु पिपरे, दिपक आत्रम, मनोज गावडे शहरात नागरिकांना ध्वनीफितद्वारे सूचना आणि मार्गदर्शन करित आहेत.