ETV Bharat / state

गडचिरोलीत सर्चमधील रुग्णालय झाले 'ट्रायबल व्हिलेज’; ८५ शस्त्रक्रिया यशस्वी

गडचिरोलीसह, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान रुग्णांसह त्यांच्या नातलगांचीही संपूर्ण व्यवस्था शोधग्राममध्ये करण्यात आल्याने रुग्णालयाला ट्रायबल व्हिलेजचे स्वरूप आले आहे

शस्त्रक्रिया करताना डॉक्टर
author img

By

Published : Apr 3, 2019, 5:12 PM IST

गडचिरोली - सर्च (शोधग्राम) येथे २८ ते ३० मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबिरात विविध आजारांच्या तब्बल ८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोलीसह, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान रुग्णांसह त्यांच्या नातलगांचीही संपूर्ण व्यवस्था शोधग्राममध्ये करण्यात आल्याने रुग्णालयाला ट्रायबल व्हिलेजचे स्वरूप आले आहे. सांगली, कोल्हापूर कराड, पुणे, फलटण, मुंबई येथील डॉक्टरांच्या चमूने या शस्त्रक्रिया केल्या.

माँ दंतेश्वरी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेता नियमितपणे शिबिरे घेतली जातात. गर्भाशय विकार, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल यासह इतरही विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी २८ ते ३० मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबिरात अपेंडिक्स आजाराच्या ५, हर्निया १२, हायड्रोसिल १० अंगावरील गाठी २० आणि मुत्रखडा विकाराची १ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर गर्भापिशवीशी संबंधित आजाराच्या २० शस्त्रक्रिया यावेळी पार पडल्या.

डॉ. रवींद्र वोरा यांच्या मार्गदर्शनात डॉ. संजय शिवदे, डॉ. संजय पुरोहित, डॉ. अजित गुर्जर, डॉ. संपत वाघमारे, डॉ. शिंत्रे, डॉ. गौतम पुरोहित, डॉ. मीना अग्रवाल, यांनी शस्त्रक्रिया केल्या. डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. राजा पाटील, डॉ. शरयू बेलापुरे, डॉ. अपर्णा पुरोहित डॉ. अनिल सालोक आणि डॉ. शिल्पा मलिक यांनी भूलतज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळली. नागपूर, यवतमाळ, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डीएमएम आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ आणि काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

रुग्णालयाच्या संचालक डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनात सदर शिबीर घेण्यात आले. डॉ. चैतन्य मलिक, डॉ. योगेश कालकोंडे, डॉ. वैभव तातावार, डॉ. मृणाल कालकोंडे, डॉ. मयुरी भलावी, डॉ. दत्ता भलावी, डॉ. अभिषेक पाटील यासह रुग्णालयाच्या संपूर्ण चमूने शिबिराची व्यवस्था सांभाळली.

११ लहान मुलांवर शस्त्रक्रिया

शिबिरात ११ लहान मुलांवर शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये लहान मुलांचा हर्निया आणि मुत्राशयाशी संबंधित विकारांचा समावेश होता. अनेकदा लहान मुलांना लघवी करताना त्रास होतो. लघवी साफ होत नाही. त्यामुळे ते सतत आजारी राहतात. अशा प्रकारचा त्रास असलेले काही बालरुग्ण उपचारासाठी सर्च मध्ये आले होते. गरज लक्षात घेता यातील ११ जणांवर शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

Intro:सर्चमधील 'ट्रायबल व्हिलेज’मध्ये विविध आजारांच्या ८५ शस्त्रक्रिया ; राज्यभरातील वैद्यकीय तज्ञांचा सहभाग

गडचिरोली : सर्च (शोधग्राम) येथे २८ ते ३० मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबिरात विविध आजारांच्या तब्बल ८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोलीसह, भंडारा, गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान रुग्णांसह त्यांच्या नातलगांचीही संपूर्ण व्यवस्था शोधग्राममध्ये करण्यात आल्याने दवाखान्याला ट्रायबल व्हिलेजचे स्वरूप आले आहे. सांगली, कोल्हापूर कराड, पुणे, फलटण, मुंबई येथील डॉक्टरांच्या चमूने या शस्त्रक्रिया केल्या.Body:माँ दंतेश्वरी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेता नियमितपणे शिबिरे घेतली जातात. गर्भाशय विकार, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल यासह इतरही विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी २८ ते ३० मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबिरात अपेंडिक्स आजाराच्या ५, हर्निया १२, हायड्रोसिल १० अंगावरील गाठी २० आणि मुत्रखडा विकाराची १ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर गर्भापिशवीशी संबंधित आजाराच्या २० शस्त्रक्रिया यावेळी पार पडल्या. डॉ. रवींद्र वोरा यांच्या मार्गदर्शनात डॉ. संजय शिवदे, डॉ. संजय पुरोहित, डॉ. अजित गुर्जर, डॉ. संपत वाघमारे, डॉ. शिंत्रे, डॉ. गौतम पुरोहित, डॉ. मीना अग्रवाल, यांनी शस्त्रक्रिया केल्या. डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. राजा पाटील, डॉ. शरयू बेलापुरे, डॉ. अपर्णा पुरोहित डॉ. अनिल सालोक आणि डॉ. शिल्पा मलिक यांनी भूलतज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळली. नागपूर, यवतमाळ, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डीएमएम आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ आणि काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

रुग्णालयाच्या संचालक डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनात सदर शिबीर घेण्यात आले. डॉ. चैतन्य मलिक, डॉ. योगेश कालकोंडे, डॉ. वैभव तातावार, डॉ. मृणाल कालकोंडे, डॉ. मयुरी भलावी, डॉ. दत्ता भलावी, डॉ. अभिषेक पाटील यासह रुग्णालयाच्या संपूर्ण चमूने शिबिराची व्यवस्था सांभाळली.

११ लहान मुलांवर शस्त्रक्रिया
शिबिरात ११ लहान मुलांवर शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये लहान मुलांचा हर्निया आणि मुत्राशयाशी संबंधित विकारांचा समावेश होता. अनेकदा लहान मुलांना लघवी करताना त्रास होतो. लघवी साफ होत नाही. त्यामुळे ते सतत आजारी राहतात. अशा प्रकारचा त्रास असलेले काही बालरुग्ण उपचारासाठी सर्च मध्ये आले होते. गरज लक्षात घेता यातील ११ जणांवर शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.Conclusion:सोबत फोटो आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.