ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम; नागपूर, हैदराबादसह मुख्य बारा मार्ग बंद - flood situation in gadchiroli

मुसळधार पावसामुळे उत्तर गडचिरोली भागात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम असून गडचिरोलीतून नागपूर, हैदराबाद, चंद्रपूर या राष्ट्रीय मार्गांसह प्रमुख बारा मार्ग बंद आहेत.

पूरस्थिती
author img

By

Published : Aug 14, 2019, 11:02 AM IST

गडचिरोली - उत्तर गडचिरोली भागातील तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे उत्तर गडचिरोली भागात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम असून गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-हैदराबाद, आष्टी-चंद्रपूर या राष्ट्रीय मार्गासह प्रमुख बारा मार्ग बंद आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम

१३ व १४ ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरला असून उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा व गडचिरोली तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे १२ ऑगस्टला दुपारनंतर तब्बल १० प्रमुख मार्ग बंद झाले. तर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गडचिरोली-नागपूर या मार्गासह अल्लापल्ली-भामरागड हा मार्ग बंद झाला. त्यामुळे यावर्षी चौथ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदी पुलावर पाणी चढल्याने आष्टी-चंद्रपूर हा मार्गही बंद झाला आहे.

दरम्यान, गडचिरोली शहरातील अनेक घरांमध्ये काल (मंगळवार) पाणी शिरले होते. आता काही प्रमाणात पाणी ओसरले आहे. तर चातगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा 'शोधग्राम सर्च' प्रकल्पही पाण्याखाली गेला होता. आज सकाळी येथील पूर्ण पाणी ओसरला आहे. तरीही डुम्मी-जवेली, गडचिरोली-धानोरा, गडचिरोली-चामोर्शी, खरपुडी-दिभना, मुरखडा-वाकडी, मौशीखांब- वडदा, कुरखेडा-वैरागड, मालेवाडा-पिसेवाडा, विश्रामपूर-गोगाव, तळोधी-आमगाव, फरी-अरततोंडी हे मार्ग बंद आहेत.

काल (मंगळवार) रात्री एक कारचालक गडचिरोली-नागपूर मार्गावरील पाल नदीच्या पुरातून कार नेताना. ती कार नदीत पडून वाहून जात असतानाच पुलालगतच्या झाडाला अडकली. बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढले तर काल इतरही ठिकाणी १४ जणांना सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

जीव धोक्यात घालून लाकडं काढण्यासाठी धडपड

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील पोर नदीचे पाणी पुलाला लागले आहे. काही वेळात पाणी पुलावर चढण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून पुलाला अडकलेली लाकडे सरपणासाठी गोळा करताना धडपड करीत दिसले. नागरिकांच्या अशा धोकादायक कृत्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.

Intro:गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम ; नागपूर, हैदराबादसह प्रमुख बारा मार्ग बंदच

गडचिरोली : उत्तर गडचिरोली भागातील तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे उत्तर गडचिरोली भागात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम असून गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-हैदराबाद, आष्टी-चंद्रपूर या राष्ट्रीय मार्गासह प्रमुख बारा मार्ग बंदच आहेत.Body:13 व 14 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरला असून उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा व गडचिरोली तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे 12 ऑगस्टला दुपारनंतर तब्बल दहा प्रमुख मार्ग बंद झाले. तर रात्री आठ वाजताच्या सुमारास गडचिरोली-नागपूर या मार्गासह अल्लापल्ली-भामरागड हा मार्ग बंद झाला. त्यामुळे यावर्षी चौथ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. आज बुधवारला सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदी पुलावर पाणी चढल्याने आष्टी-चंद्रपूर हा मार्गही बंद झाला आहे.

दरम्यान गडचिरोली शहरातील अनेक घरांमध्ये काल पाणी शिरले होते. आता काही प्रमाणात पाणी ओसरला आहे. तर चातगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा 'शोधग्राम सर्च' प्रकल्पही पाण्याखाली गेला होता. आज सकाळी येथील पूर्ण पाणी ओसरला आहे. तरीसुद्धा डुम्मी- जवेली, गडचिरोली-धानोरा, गडचिरोली-चामोर्शी, खरपुडी-दिभना, मुरखडा-वाकडी, मौशीखांब- वडदा, कुरखेडा-वैरागड, मालेवाडा-पिसेवाडा, विश्रामपुर-गोगाव, तळोधी-आमगाव, फरी-अरततोंडी हे मार्ग बंद आहेत.

काल रात्री एका कारचालकाने गडचिरोली-नागपूर मार्गावरील पाल नदीच्या पुरात वाहन टाकल्याने कार वाहून जात असतानाच पुलालगतच्या झाडाला अडकली. बचाव पथकाने शर्तीचे प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढले तर काल इतरही ठिकाणी 14 जणांना सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

बॉक्स
जीव धोक्यात घालून लाकडं काढण्यासाठी धडपड
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील पोर नदीचे पाणी पुलाला लागले आहे. काही वेळात पाणी पुलावर चढण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून पुलाला अडकलेले लाकडं सरपणासाठी गोळा करताना धडपड करीत दिसले. नागरिकांच्या अशा धोकादायक कृत्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.