धुळे- शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध जल प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. या जलप्रकल्पामधील पाण्याचा विसर्ग पांझरा नदीपात्रात करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील फरशी पुलावरुन पाणी वाहू लागले असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
धुळे शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. साक्री माळमाथा परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेला जलप्रकल्प अक्कलपाडा धरण ओसंडून वाहू लागलेय. या धरणातील पाणीसाठा विविध प्रकल्पांमध्ये विसर्ग करण्यात येत आहे. नकाणे हरणमाळ, त्या तलावातील पाण्याचा पांझरा नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्याने नदी ओसंडून वाहू लागली आहे.
शहरातील फरशी पुलावरून पाणी वाहत असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.