ETV Bharat / state

धुळे शहरालगतच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू - दगडी नाला तलाव धुळे

धुळे शहरालगत असलेल्या लळींग येथील दगडी नाला तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हाकिम मोहम्मद (१६), अरबाज खान मुसा खान (१७) दोघे राहणार मौलगीगंज, असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

Two minors drowned while swimming in a lake near Dhule city
धुळे शहरालगतच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
author img

By

Published : Aug 3, 2020, 12:00 AM IST

धुळे - शहरालगत असलेल्या लळींग येथील दगडी नाला तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हाकिम मोहम्मद (१६), अरबाज खान मुसा खान (१७) दोघे राहणार मौलगीगंज, असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

धुळे शहरालगतच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

हेही वाचा - राज्यात कोरोनामुळे 103 पोलिसांचा मृत्यू

एकूण पाच जण मित्र हे तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक मित्र पाण्यात बुडताना पाहून दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे मित्र पाण्यात बुडाले. या दोघांसह आणखी तीन जण त्यांच्यासोबत पोहण्यासाठी गेले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तलावात पोहता येणाऱ्या स्थानिकांच्या मदतीने दोन्ही बुडालेल्या मुलांना शोधण्याचे कार्य सुरू असून तलाव परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शोध कार्यास अडथळा येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.