ETV Bharat / state

दोन ट्रकचा समोरासमोर अपघात; चालक गंभीर जखमी - रूग्णालय

धुळ्यातील सोनगीर दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या क्रांती स्मारकाजवळ मालवाहू ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे. यामध्ये एक ट्रक चालक गंभीर जखमी आहे.

अपघातग्रस्त वाहने
author img

By

Published : Jul 4, 2019, 12:15 PM IST

धुळे - तालुक्यातील सोनगीर दोंडाई रस्त्यावर असलेल्या क्रांती स्मारकाजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून या अपघातामुळे सोनगीर दोंडाईचा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमी चालकाला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धुळे तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा रस्त्यावर सोनगीरकडून दोंडाईच्या दिशेनेकडे जाणारी ट्रक (एम एच १८ ए ए ५१७) आणि दोंडाईकडून सोनगीरकडे जाणारा ट्रक (ए पी २९ यु ५३७९) यांची चिमठाणे पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रांती स्मारकाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक चालक पंकज बोरसे (वय ३० वर्षे, रा. कामपूर ता. शिंदखेडा ) याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. चालक पंकज बोरसे हे कॅबिनमध्ये अडकल्याने त्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Intro:धुळे तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या क्रांती स्मारकाजवळ ट्र्क आणि आयशर यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात आयशर चालक गंभीर जखमी झाला असून या अपघातामुळे सोनगीर दोंडाईचा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आयशर चालकाला पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Body:धुळे तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा रस्त्यावर सोनगीर कडून दोंडाईचा कडे जाणारी आयशर (एमएच १८ ए ए ५१७) आणि दोंडाईचाकडून सोनगीरकडे जाणारा ट्र्क (एपी २९ यु ५३७९) यांची चिमठाणे पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रांती स्मारकाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात आयशर चालक पंकज बोरसे (वय ३० रा कामपूर ता शिंदखेडा ) याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. आयशर चालक पंकज बोरसे हे कॅबिन मध्ये अडकल्याने त्यांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.