ETV Bharat / state

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन - एसटी कर्मचारी वेतनवाढ मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने बसस बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्या

कर्मचाऱ्यांचे आंदोलन
कर्मचाऱ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Oct 27, 2021, 8:04 PM IST

धुळे - ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनावाढीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी एसटी चालक वाहकांनी धुळे बसस्थानकात आंदोलन सुरू केले आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

हेही वाचा-एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याची पंढरपूरमध्ये आत्महत्या

राज्य सरकारकडून वेतनवाढीसाठी टाळाटाळ

कोविड काळात तसेच महत्त्वाच्या दिवसांत राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सेवेत हजर असतात. मात्र, आमच्या पगाराची किंवा भत्ता देण्याची वेळ आल्यावर सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी दिलीप राजपूत यांनी केला आहे. धुळे बस स्थानकात बसस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता द्या - एसटी कर्मचारी काँग्रेस!

वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, घरभाडे भत्ता राज्य सरकारप्रमाणे 08:16 24 द्यावे, अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत.

हेही वाचा-ऐन सणासुदीत एसटी कर्मचारी विरुद्ध राज्य सरकार संघर्ष अटळ- कर्मचारी संघटनांचा इशारा

दरम्यान, राज्यात सोलापूर, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांतही एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे.

एसटी कर्मचारी कृती समितीच्या मागण्या

1)एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण झाले पाहिजे.

2) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे.
3) वाढीव घरभाडे 8, 16, 24 टक्के या दराने मिळालेच पाहिजे.
4) सर्व सण उचल 12,500 रुपये मिळालीच पाहिजे.
5) वार्षिक वेतन वाढ 2 टक्क्यांवरून 3 टक्के मिळालीच पाहिजे.
6) न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळालेच पाहिजे.
7) दिवाळी बोनस 15,00 रूपये मिळालाच पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.