ETV Bharat / state

ओबीसी संघटनेतर्फे धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोको

author img

By

Published : Jun 18, 2021, 12:28 PM IST

धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर हाताला काळ्या फिती लावून ओबीसी संघटनेतर्फे हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने या रास्ता रोको करण्यात आला.

Road block on Mumbai-Agra highway in Dhule by OBC organization
ओबीसी संघटनेतर्फे धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोखो

धुळे - मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आल्याचे दिसत असतानाच दुसरीकडे देखील ओबीसी समाज बांधव आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर गुरूवारी आंदोलन करत आहेत. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर ओबीसी संघटनांतर्फे संपूर्ण राज्यामध्ये या निर्णया विरोधामध्ये आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. धुळ्यात देखील मुंबई-आग्रा महामार्गावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा -

हाताला काळ्या फिती लावून ओबीसी संघटनेतर्फे हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने या रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोको दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे बघावयास मिळाले. आंदोलन अधिक निघण्यापूर्वी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

तोपर्यंत आंदोलन सुरूच -

ओबीसींना न्याय हक्क जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ओबीसी संघटनांतर्फे अशा पद्धतीचे राज्यभर आंदोलन यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - आक्रोश मोर्चा हा राज्य नव्हे तर केंद्र सरकार विरोधात - छगन भुजबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.