ETV Bharat / state

गांजा तस्कर 'डॉन' महिलेच्या घरावर पोलिसांचा छापा; 50 किलो गांजासह जप्त केली रोख रक्कम - धुळ्यात गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा

गांजा तस्कर महिलेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ५० किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली. शोभा साळुंखे उर्फ शोभा डॉन असे पोलिसांनी छापा टाकलेल्या गांजा तस्कर महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी पोलिसांनी शनिनगर परिसरातील या महिलेच्या घरावर छापा मारला.

dhule
जप्त केलेला गांजा पाहताना पोलीस अधिकारी
author img

By

Published : Jul 9, 2020, 6:20 PM IST

Updated : Jul 9, 2020, 6:33 PM IST

धुळे - पोलिसांनी गांजा तस्कर महिलेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ५० किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली. शोभा साळुंखे उर्फ शोभा डॉन असे पोलिसांनी छापा टाकलेल्या गांजा तस्कर महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी पोलिसांनी शनिनगर परिसरातील या महिलेच्या घरावर छापा मारला. या अगोदरही या महिलेवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गांजा तस्कर 'डॉन' महिलेच्या घरावर पोलिसांचा छापा; 50 किलो गांजासह जप्त केली रोख रक्कम

शोभा साळुंखे उर्फ शोभा डॉन या महिलेच्या घरात गांजा असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. त्या माहितीवरुन पोलिसांनी गुरुवारी दुपारी या महिलेच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी तब्बल दोन ते अडीच लाख रुपयाचा गांजा जप्त केला. यासह पोलिसांनी घरातून पंचवीस ते तीस हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे पन्नास किलो गांजा जप्त केला असून शोभा साळुंखे या महिलेवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी शोभा साळुंखेला ताब्यात घेण्यात आले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकासह जाऊन ही धडक कारवाई केली आहे. दरम्यान जिल्ह्यात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असला, तरी मूळ सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे, असे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सांगतात. मात्र लहान मोठ्या कारवायांसोबत मूळ सुत्रधारांपर्यंत पोलिसांनी पोहोचण्याची गरज निर्माण झाली आहे.

Last Updated : Jul 9, 2020, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.