धुळे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने कुसुंबा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सरकार सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा - सातारा लोसकभा पोटनिवडणूक: उदयनराजेंच्या गडाला राष्ट्रवादी देणार का हादरा?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह ७० जणांव सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. शिवस्वराज्य यात्रेसह शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून भाजप सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला आहे.
हेही वाचा - वरळी मतदारसंघ : सेनेच्या बालेकिल्ल्यात युवासेना प्रमुखांना मिळणार का जनआशीर्वाद?
शरद पवार ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे धुळे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यातील 'या' तीन मतदारसंघातून वंचितचे उमेदवार जाहीर