धुळे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मैं भी चौकीदार' कार्यक्रमाचे धुळ्यात थेट प्रक्षेपण करण्यात आले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम दाखविण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाबाबत नागरिकांना कोणतीही माहिती नसल्याने, येथे केवळ कार्यकर्त्येच उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी थेट संवाद साधला. 'नमो टीव्ही' या वाहिनीच्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे धुळ्यात थेट प्रक्षेपण करण्यात आले. खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.