धुळे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करण्यात आली आहे. याचा निषेध करीत हिंदू जनजागृती समिती धुळे जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अॅड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणी गेल्या २ दिवसांपूर्वी सीबीआयने सनातन संस्थेचे अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली. अॅड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी आजवर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. सीबीआयने गेल्या ३ वर्षात अनेक निरपराध हिंदूंना संशयित म्हणून अटक केली आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना करण्यात आलेल्या अटकेचा हिंदू जनजागृती समितीने निषेध केला आहे. त्यांची त्वरित मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी करीत समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची मुक्तता न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे. याबाबत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले.