धुळे - मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. कृषी कायदे असो अथवा खतांची भाववाढ या प्रत्येक विषयाबाबत मोदी सरकारने अत्यंत संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या हिताची राखले आहे. मोदी सरकार शेतकन्यांच्या भल्यासाठी काम करीत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. खतांच्या किंमती कमी करून आणल्याबद्दल खा.डॉ. सुभाष भामरे यांचा आज हर हर महादेव विजय व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच शेतकऱ्यांनी सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते.
खा. डॉ. सुभाष भामरे म्हणाले, की कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आली आहे. कोरोनामुळे प्रचंड मनुष्यहानी झाली आहे. कोरोना महामारीमुळेच पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ झाली. शेतीसाठीच्या खंताच्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या. त्याचा परिणाम खतांच्या भाववाढीवर झाला. खतांच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश होता. मला भाजप कार्यकत्यांसह अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. त्यांना मी सांगितले की, धीर धरा, मी नक्कीच मार्ग काढेल. त्यानंतर मी दिल्ली गाठली.
राज्यमंत्री मनसुव भाई यांची भेट केली मागणी
राज्यमंत्री मनसुव भाई यांना भेटून शेतकऱ्यांमधील रोष याबाबतची कल्पना त्यांना दिली. पीएमओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत खत दरवाढीचा विषय पोहोचवला. मात्र पंतप्रधान मोदींनी त्यापुर्वीच या विषयावर कामाला सुरुवात केली होती. खतांच्या किंमती कमी करण्याबाबत मंत्रीमंडळ गट स्थापन केला. त्या गटात अर्थमंत्री, कृषीमंत्र्यांचा समावेश होता. 'चिंता करू नका तीन दिवसात भाव कमी होतील' असे मी शेकऱ्यांना सांगितले होते. मात्र, पंतप्रधान मोदी हे खतांच्या किंमती कमी करण्याबाबत आधीपासूनच काम करीत असल्याने तीन दिवसातच पंतप्रधान मोदींनी खतांची दरवाढ कमी केली. १२०० रुपयांच्या खतांच्या थैलीवर १२०० रुपयांचे अनुदान दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या दराप्रमाणेच खत मिळेल. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, तसेच शेतकऱ्यांवतीने त्यांचे आभारही मानतो, असेही खा. डॉ. भामरे म्हणाले.
हेही वाचा - राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादीच उपलब्ध नाही!