धुळे - जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातील थोडाफार पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणी केली. मात्र, गेल्या महिन्याभऱ्यापासून पावसाने दडी मारली आहे. आज-उद्या दमदार पाऊश पडले अशा अपेक्षेत शेतकरी आहे. मात्र, अद्यापही पाऊस आलेला नाही. मातीतल्या ओलाव्यामुळे पेरलेले पीक तर उगवले. मात्र, आता उगवलेले पीक पावसाअभावी सुकलेले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
पावसाअभावी धुळे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे काही तालुक्यात अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर शहरात नागरिकांना ८ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.