धुळे - दरवर्षी जून महिन्यातील 15 तारिख हा संपुर्ण विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असतो. याचे कारण प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि नव्या इयत्तेची सुरुवात ही याच दिवशी होत असते. म्हणून 15 जून हा दिवस शाळा उघडण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो.
आज (सोमवार) म्हणेच 15 जून, हा राज्यातील दिवस शाळा उघडण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांची शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. काही हसत-खेळत तर काही विद्यार्थी रडत-रडत शाळेत प्रवेश करत असतात. या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाला प्रारंभ होत असतो. मात्र, यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे शाळा उघडण्याचा दिवस अनिश्चित आहे. त्यामुळे दरवर्षी लहान मुलांच्या आवाजाने हसण्या-खेळण्याने दुमदुमणारा शाळेचा परिसर यंदा मात्र, शांतशांत आहे.
हेही वाचा... महाविद्यालयीन परीक्षांबाबत लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल - प्राजक्त तनपुरे
त्यामुळेच आज या शाळेनेच विद्यार्थ्यांशी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थ्यांविना ओसाड पडलेली शाळा, आणि मनाला क्लेशदायक ठरणारी नीरव शांतता. हे चित्र यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात आणि देशात पाहायला मिळाले. कोरोना आजाराचे वैश्विक संकट लवकर दूर होऊन शाळेचा परिसर लवकर विद्यार्थ्यांच्या आवाजाने आणि किलबिलाटाने गजबजून जावा एवढीच माफक अपेक्षा.