ETV Bharat / state

धुळ्यात कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन - dhule latest news

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने अधिकचे नुकसान सहन करावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदीत शिथिलता आणली जात असताना कांदा निर्यात बंदी करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

dhule shivsena agitation for release of ban on onion export
धुळ्यात कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन
author img

By

Published : Sep 16, 2020, 3:20 PM IST

धुळे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घातलेली कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या मागणीसाठी धुळ्यात शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीत आंदोलन करण्यात आले.

धुळ्यात कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने अधिकचे नुकसान सहन करावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदीत शिथिलता आणली जात असताना कांदा निर्यात बंदी करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या कांदा निर्यात बंदी विरोधात संपूर्ण राज्यभरात आंदोलने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेकडून आंदोलन करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधव आणि शिवसैनिक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.