धुळे - शहर पोलिसांनी गुटखा व अन्य प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांसह 31 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीनदोडिया चौकात नाकाबंदी करत असताना ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - बुलडाणा: लाखो रुपयांचा गुटखा जप्त; पंधरा दिवसातील दुसरी कारवाई
चौकात एका लक्झरी बसला थांबवून पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, गाडीतील एका सीटखाली संशयित खोके आढळले. त्या खोक्यांमध्ये गुटखा व अन्य प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. लक्झरी बससह सुमारे 31 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.