ETV Bharat / state

धुळ्याचा 'रेड झोन'मध्ये समावेश; कोरोनाबाधितांचा आकडा 15 वर

author img

By

Published : Apr 23, 2020, 11:26 AM IST

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून हा आकडा आता 15 वर जाऊन पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्याचा 'रेड झोन'मध्ये समावेश झाला आहे.

corona in dhule
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून हा आकडा आता 15 वर जाऊन पोहोचला आहे.

धुळे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून हा आकडा आता 15 वर जाऊन पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्याचा 'रेड झोन'मध्ये समावेश झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने लॉकडाऊन आणखी कडक केले आहे. तसेच 'रेड झोन'मध्ये गेल्याने जिल्ह्यातील उद्योग आणि व्यापाराच्या नियमांवरील शिथिलता काढण्यात आली आहे. नवीन बाधितांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आले आहे. सध्या संपर्कात आलेल्या उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू आहे.

याआधी जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, गतीने बाधितांची संख्या वाढल्याने ऑरेंज झोन मध्ये गेला. यानंतर आता धुळ्याचा रेड झोन मध्ये समावेश झाला आहे. कोरोनाबधितांची संख्या 9 वरून १५ वर जाऊन पोहचली आहे. ही संख्या 6 ने वाढली असून या रुग्णांमध्ये एक महिला शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील आहे. तर उर्वरित सहा रुग्ण शहरातील ताशा गल्ली, मच्छीबाजार परिसरातील आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.