ETV Bharat / state

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात ४ जण जागीच ठार, ३ गंभीर - लळींग

मुंबई आग्रा महामार्गावर शिर्डीकडून धुळ्याकडे येणारा भरधाव ट्रक दोन वाहनांना उडवून रस्त्याच्या कडेला खड्यात गेला. या अपघातात एका बालिकेसह ४ जण जागीच ठार झाले तर अन्य ३ जण जखमी झाले. जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

अपघातात चेंदामेंदा झालेला आॅटो
author img

By

Published : Jun 12, 2019, 5:12 PM IST

धुळे - शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील लळींग गावाजवळ बुधवारी दुपारी ट्रक आणि आयशर टॅम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले, तर अन्य ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

dhule-accident-in-dhule-mumbai-agra-highway-4-people-died-3 injured
मुंबई आग्रा महामार्गावरील अपघात झालेला ट्रक

धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग गावाजवळ असलेल्या लांडोर बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झाला. शिर्डीकडून धुळ्याकडे येणारा भरधाव ट्रक ( क्रमांक एमएच १८ डी ए २१९२) वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याचा दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला घुसला. त्याचवेळी धुळ्याकडून मालेगावकडे जाणारा गोदावरी दूध संघाच्या आयशर वाहन ( क्रमांक एमएच १७ ५२६९) यावर हा ट्रक जाऊन आदळला. दुधगाडीच्या पाठोपाठ असलेल्या अॅपेरिक्षा (क्रमांक एमएच १८, डब्ल्यू ५६२९) यालाही ट्रकने जोरदार धडक दिली.

ट्रकच्या धडकेत अॅपेरिक्षातील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. दोघा वाहनांना उडवून ट्रक रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेला. ट्रकच्या धडकेत दुधगाडीचा चुराडा होऊन त्यातील एका बालिकेसह ४ जण जागीच ठार झाले. तर अन्य ३ जण जखमी झाले.

या अपघातात अलिया जाकीर अली, नोशादबी हमीद अली, हमीद अली साहेबअली आणि अन्य एका ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्याची ओळख पटू शकलेली नाही. हे चौघे जागीच ठार झाले. तर ट्रकचा चालक शोकतखान करीमखान पठाण, विक्की नंदलाल ठाकरे आणि अतुल चैत्राम पाटील हे जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Intro:धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील लळींग गावाजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भिषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर अन्य ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. Body:धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील लळींग गावाजवळ असलेल्या लांडोर बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. शिर्डीकडून धुळ्याकडे येणारा भरधाव ट्रक ( क्रमांक एमएच १८ डी ए २१९२) वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याचे कठडे तोडून दुसऱ्या बाजूला घुसला. त्याचवेळी धुळ्याकडून मालेगावकडे जाणारा गोदावरी दूध संघाच्या आयशर वाहन ( क्रमांक एमएच १७ ५२६९) यावर हा ट्रक जाऊन आदळला. दुधगाडीच्या पाठोपाठ असलेल्या ऍपेरिक्षा (क्रमांक एमएच १८, डब्ल्यू ५६२९) यालाही ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेत ऍपेरिक्षातील प्रवाशी रस्त्यावर फेकले गेले. दोघा वाहनांना उडवून ट्रक रस्त्याच्या कडेला खड्यात गेला. ट्रकच्या धडकेत दुधगाडीचा चुराडा होऊन त्यातील एका बालिकेसह ४ जण जागीच ठार झाले. तर अन्य ३ जण जखमी झाले. या अपघातात अलिया जाकीर अली, नोशादबी हमीद अली, हमीद अली साहेबअली आणि अन्य एका ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्याची ओळख पटू शकलेली नाही. हे चौघे जागीच ठार झाले. तर ट्रकचा चालक शोकतखान करीमखान पठाण, विक्की नंदलाल ठाकरे आणि अतुल चैत्राम पाटील हे जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.