धुळे : शेतात कांद्यांचा रोपांवर फवारणी करतांना फवारणीचे औषध अंगावर पडल्याने, ५५ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ( farmer woman Death in falling on spray medicine )धुळे तालुक्यातील देऊर गावात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महिलेला धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत ( Farmer women death in Dhule ) घोषित केले.
पंपाचे नोझल अचानक निघाल्याने घडली घटना - रब्बी कांदा लागवडीच्या कामात सध्या शेतकरी व्यस्त आहे. धुळे तालुक्यातील देऊर येथील ५५ वर्षीय महिला निमलाबाई अशोक पाटील या देऊर शिवारातील शेतात कांदा रोपांवर फवारणी करत असताना फवारणी पंपाचे नोझल अचानक निघाल्याने फवारणीचे औषध त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. त्यांना धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची धुळे तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाेलीस पुढील तपास करत आहे.
फवारणी करताना काळजी घेण्याचे आवाहन - शेतात पिकांवर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. शेतात पिकांवर फवारणी करतांना कृषी विभागाने मार्गदर्शित केलेल्या सूचनांचं पालन करावे, फवारणी करताना पुरेशी काळजी घ्यावी, या गोष्टी या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत. म्हणून फवारणी करताना पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.