ETV Bharat / state

सायबर कॅफे आऊटडेटेड, मोबाईलवरच पाहिले विद्यार्थ्यांनी निकाल

दरवेळी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची सायबर कॅफेवर होणारी गर्दी आता कमी झाली. प्रत्येकजण आपल्या हातातल्या स्मार्ट फोनवरच निकाल पाहत होते. त्यामुळे निकालाच्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांच्या गर्दीने भरणारे सायबर कॅफे ओस पडू लागले आहेत.

सायबर कॅफे आऊटडेटेड, मोबाईलवरच पाहिले विद्यार्थ्यांनी निकाल
author img

By

Published : May 28, 2019, 5:28 PM IST

धुळे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. हा निकाल संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दरवेळी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची सायबर कॅफेवर होणारी गर्दी आता कमी झाली. प्रत्येकजण आपल्या हातातल्या स्मार्ट फोनवरच निकाल पाहत होते. त्यामुळे निकालाच्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांच्या गर्दीने भरणारे सायबर कॅफे ओस पडू लागले आहेत.

सायबर कॅफे आऊटडेटेड, मोबाईलवरच पाहिले विद्यार्थ्यांनी निकाल

दहा-बारा वर्षांपूर्वी भारतात इंटरनेटचे आगमन झाले आणि त्याने तरुणाईला भूरळ घातली. त्याकाळात घरोघरी संगणक घेणे शक्य नसल्याने सायबर कॅफेचा नवा उद्योग उदयास आला. मात्र, आज 10 वर्षानंतर स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज प्रत्येकाच्या बॅगमध्ये लॅपटॉप तर खिशात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे सायबर कॅफेकडे वळणाऱ्या पावलांची संख्या रोडावली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. परंतु, सायबर कॅफेमध्ये यंदा निकाल पाहण्यासाठी कोणी फिरकलेच नाही. सर्वांनी निकाल आपापल्या मोबाईलवरच पाहिले.

दरवर्षी निकालाच्या निमित्ताने सायबर कॅफे चालकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र, आता निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत नसल्याची खंत कॅफे चालकांनी व्यक्त केली.

Intro:महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची सायबर कॅफे वर होणारी गर्दी आता कमी झाली असून प्रत्येकजण आपल्या हातातल्या स्मार्ट फोन वर निकाल पाहू लागला आहे. यामुळे निकालाच्या दिवशी विदयार्थी आणि पालकांच्या गर्दीने भरलेले सायबर कॅफे आता ओस पडू लागले आहेत. Body:
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज प्रत्येकजण प्रगती करतोय. याच विज्ञान आणि तंत्रज्ञानाने तयार झालेल्या स्मार्ट फोनने प्रत्येकाचं जीवन व्यापून टाकलं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा समजल्या जात होत्या मात्र त्यासोबत आणखी एक गरज वाढली आहे ती म्हणजे आपल्या हातातला स्मार्ट फोन. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी पूर्वी सायबर कॅफे वर विदयार्थी आणि पालकांची गर्दी होत असे. निकाल काय लागतो याची सगळ्यांना उत्सुकता असायची. मात्र आज निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही सायबर कॅफे वर जाण्याची गरज पडत नाही, याला कारण आहे तुमच्या आमच्या हातातला स्मार्ट फोन. या स्मार्ट फोनवर अवघ्या काही क्षणात निकाल पाहता येतो. मात्र यामुळे निकालाच्या दिवशी गर्दीने ओसंडून वाहणारे सायबर कॅफे मात्र आज ओस पडू लागले आहेत. निकालाच्या निमित्ताने सायबर कॅफे चालकांचा व्यवसाय तेजीत येत असे मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे. निकाल पाहल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद सायबर कॅफे चालकांना पाहायला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.