ETV Bharat / state

'व्यक्तिगत अहंकारामुळे भाजपाला लागणार उतरती कळा'

भाजपाचा 105 आकडा हा त्यांचा शेवटचा मोठा आकडा असणार आहे. यापुढील काळात 105 वरून भाजप 51 वर येऊ शकेल. मात्र, 106 वर जाणार नाही, असा दावा धुळे शहराचे माजी आमदार गोटे यांनी केला आहे.

अनिल गोटे
अनिल गोटे
author img

By

Published : Oct 21, 2020, 7:07 PM IST

Updated : Oct 21, 2020, 8:29 PM IST

धुळे - व्यक्तिगत अहंकारामुळे भाजपाची हानी झाली आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यापासून भाजपाला उतरती कळा लागेल, अशी टीका धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केली.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ खडसे यांचा शुक्रवारी (दि. 23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर विविध पक्षांकडून भाजपावर प्रचंड टीका केली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत गोटे म्हणाले, एकनाथ खडसे यांनी गेली अनेक वर्षे जो त्रास सहन केला, त्याला मी सलाम करतो. मात्र, भाजपाच्या व्यक्तिगत अहंकारामुळे पुढील काळात पक्षाला उतरती कळा लागेल. भाजपाचा 105 आकडा हा त्यांचा शेवटचा मोठा आकडा असणार आहे. यापुढील काळात 105 वरून भाजप 51वर येऊ शकेल. मात्र, 106 वर जाणार नाही, असा दावा अनिल गोटे यांनी केला.

बोलताना अनिल गोटे

हेही वाचा - 'राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना 50 हजार एकरी मदत दिली पाहिजे'

Last Updated : Oct 21, 2020, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.