धुळे - शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आमंत्रित करत असल्याचा टोला लगावत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी या थाळीचा आस्वाद घेतला. बहुप्रतिक्षीत महाविकास आघाडीच्या 'शिवभोजन थाळी'चे प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर उद्धाटन झाले. सत्तार यांनी धुळ्यातील या योजनेचा शुभारंभ केला.
हेही वाचा - बीजमाता राहीबाई पोपरेंची 'पद्मश्री'नंतर पहिली मुलाखत 'ईटीव्ही' भारतला, पाहा काय म्हणाल्या..
शहरात शिवभोजन थाळीचे राज्याचे ग्रामविकास आणि महसूल मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. धुळे शहरात 4 ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शिवभोजन थाळीच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरन डी, यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, शिवभोजन थाळी ही योजना गोरगरिबांसाठी आहे, याठिकाणी घरच्या सारखे जेवण मिळेल तसेच त्यांनी थाळीचा आस्वाद घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रीत केले.