धुळे - शहरातील एका 56 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एका 43 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर शहरातील पाशा गल्ली या ठिकाणी राहणाऱ्या एका 56 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची धुळे जिल्ह्यातील संख्या 3 झाली आहे. यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून एकावर उपचार सुरू आहेत.