ETV Bharat / state

धुळे : पोहण्यासाठी गेलेल्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लळिंग धबधब्यात बुडून मृत्यू

धुळे शहराजवळील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस.एस.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे

author img

By

Published : Jun 22, 2020, 10:20 PM IST

Updated : Jun 22, 2020, 10:43 PM IST

student died drowning in Laling waterfall in dhule
धुळ्यातील लळिंग धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

धुळे - शहराजवळील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस.एस.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या 6 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना आज (सोमवार) सायंकाळी घडली. मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थ्यांपैकी 2 जण हे धुळे शहरातील रहिवासी आहोत. तर 1 जण अमळनेर येथील रहिवासी आहे. इतर 3 जणांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा... ...अन् त्याने नवविवाहित पत्नीच्या चितेवरच घेतली उडी; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

शुभम अनिल चव्हाण (20 रा. अभियंता नगर, धुळे) शुभम प्रेमराज पाटील (20 रा. पळासदळे, अंमळनेर) आणि रोहीत कोमल सिंग गिरासे (19 रा. जीटीपी अंबिकानगर, धुळे) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

शुभम चव्हाण याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमी विद्यार्थी घाबरले असून धक्का बसल्याने ते काहीही बोलत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Last Updated : Jun 22, 2020, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.